Plantation's importance telling letter send to your friend in MARATHI !!!
Answers
Explanation:
Divya Marathi
वृक्षारोपण करूया नवजीवनासाठी
या पावसाळ्यात दैनिक ‘दिव्य मराठी’ व एमजीएम औरंगाबादमध्ये लावणार एक
सामाजिक बांधिलकी जोपासत दैनिक ‘दिव्य मराठी’ने आपल्या औरंगाबाद शहरात एक लाख रोपं लावण्याचा संकल्प केला आहे. या कामी एमजीएम समूहाने पुढाकार घेत रोपं उपलब्ध करून दिली आहेत. आमच्या या कार्यात आपणही सहभागी व्हा- जास्तीत जास्त वृक्षारोपण करून, कारण हीच योग्य वेळ आहे वृक्षारोपणासाठी....
आपल्या देशाच्या एकूण भूमीपैकी केवळ ११ टक्के क्षेत्रच जंगलाने व्यापलेले आहे. मोठ्या प्रमाणावर होणाºया जंगलतोडीमुळे जलवायू परिवर्तन घडून येत आहे. पर्यावरणातील या बदलांमुळेच भविष्यात देशातल्या काही भागांत पूरसदृश परिस्थिती आणि काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. एकूणच जागतिक तापमानात सतत होणारी वाढ लक्षात घेता यासाठी आतापासूनच ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
जगातल्या अनेक देशांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. ‘बिलियन ट्री’ अभियानात भारतासहित जगभरातील १६६ देश सहभागी झाले आहेत. या अभियानांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवणाºया देशांच्या यादीत भारत आठव्या क्रमांकावर आहे. भारतातील उत्तर प्रदेशाने या बाबतीत चांगला विक्रम नोंदवला आहे. उत्तर प्रदेशात एका दिवसात १०.५ मिलियन रोपं लावण्यात आली आणि या अभियानात सहा लाख लोकांनी योगदान दिले. वृक्षारोपणात भारताला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी तुमच्या-आमच्या सक्रिय सहभागाची गरज आहे.
गेल्या दशकात भारतात जितक्या झाडांचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई करण्यासाठी १३० मिलियन हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे. हे क्षेत्रफळ पेरू देशाच्या एकूण भूभागाइतके आहे.
जगभरातल्या देशांवर सध्या जलवायू परिवर्तनाचे संकट आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. कोपनहेगन इथे डिसेंबर २००९ मधे झालेल्या वैज्ञानिक परिषदेत जगातील ७० देशांचे जवळपास दोन हजारपेक्षा जास्त वैज्ञानिक सहभागी झाले होते. ग्रीन हाऊसमधून अत्याधिक प्रमाणात वायू उत्सर्जन होत असल्यानेच जगासमोर हे संकट उभे राहिले आहे, असाच या परिषदेतील वैज्ञानिकांचा सूर होता. याच कारणामुळे वैश्विक तापमानात सातत्याने वाढ होऊन पर्यावरणाचे चक्रही बिघडते आहे, असे मतही या परिषदेतील वैज्ञानिकांनी व्यक्त केले. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने तापमानात वाढ होत आहे आणि सन २०२० पासूनच याचे भयानक परिणाम दिसायला सुरुवात होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय. जलवायू परिवर्तनाच्या विनाशकारी परिणामांपासून वाचवण्यासाठी जनजागृती निर्माण करण्याचे काम रेडक्रॉस, रेड क्रिसेंट यांसारख्या जागतिक स्तरावरील संस्था करत आहेत. ‘जाणून घ्या धोक्याचा इशारा - वेळीच उपाययोजना करा,’ हे तर या संस्थांचे घोषवाक्य आहे. जगभरातील जवळपास शंभर मिलियन नागरिक समुद्रकिनारी वास्तव्य करतात, तापमानवाढीच्या दुष्परिणामांना याच लोकांना सगळ्यात आधी सामोरे जावे लागणार आहे.
भरपूर वृक्ष लावलेल्या बागेत नियमित फिरल्याने,व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तणावामुळे शरीरावर होणाºया नकारात्मक परिणामांचा प्रभावही कमी होतो. झाडे जितकी जास्त असतील तितक्या प्रमाणात श्वसनाशी संबंधित रुग्णांची संख्या घटेल, असे संशोधनकर्त्यांचे मत आहे. आयुष्यात वृक्ष किती महत्त्वाचे आहेत या, जाणून घेऊ...
वृक्ष म्हणजे आॅक्सिजनचा कारखाना
कुटुंबातील चार सदस्यांसाठी एका वर्षभरात जितक्या आॅक्सिजनची आवश्यकता असते तितका आॅक्सिजन एक सामान्य आकाराचे झाड एका वर्षात निर्माण करते. जर तुम्ही घराच्या पश्चिम दिशेला एक झाड आज लावले तर तुमच्याकडील वीज वापरात पाच वर्षांत तीन टक्के कपात होईल. १५ वर्षांत ही वीज कपात १२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.