Hindi, asked by deepa2855, 1 year ago

Plastik khachra mukt bharat nibhadh marathi

Answers

Answered by abhayvishwakarma13
1

Answer:

पुणे- ‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील सर्व शहरे प्लास्टिकच्या कच-यापासून मुक्त करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘प्लास्टिक कचरामुक्त अभियान’ १३ फेब्रुवारीपासून सुरू केले जाणार आहे. या अभियानाची सुरुवात पुणे शहरापासून केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय पर्यावरण व वने राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

विद्यार्थी हे परिवर्तनाचे मुख्य घटक आहेत. पुण्यातील शेकडो शाळा व महाविद्यालयांतील आठवी, नववी, अकरावी आणि पदवीच्या प्रथम वर्षातील एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील. हे विद्यार्थी त्यांना ठरवून दिलेल्या परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करणार आहेत.

दोन तास चालणा-या या अभियानात एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, स्वयंसेवी संस्था सहभागी होतील. त्याचबरोबर रेडिओ, सोशल मीडिया आणि स्थानिक दूरदर्शन वाहिन्याही जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचा प्रसार करतील. कचरामुक्ती अभियान हे वर्षभर सुरू राहणार असून हा जनतेचा कार्यक्रम आहे, असेही ते म्हणाले.

देशात प्रत्येक दिवसाला १५ हजार टन प्लास्टिक कचरा होतो. त्यातील नऊ हजार टन प्लास्टिकवर प्रक्रिया केली जाते, परंतु सहा हजार टन कचरा प्रत्येक दिवशी साठतो. या हिशेबाने दरवर्षी देशात २१ लाख १६ हजार टन प्लास्टिक कचरा साचून वातावरणाची आणि निसर्गाची प्रचंड हानी करत आहे. हे थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी ही मोहीम हाती घेतली असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.

Similar questions