please ans. in marathi only....no spam...
पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात??
दहावी भूगोल
Answers
Answer:
कारन तो अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांना विभागतो म्हणून त्याला जलविभाजक असे म्हणतात
Explanation:
hope it's help you
Answer:
पश्चिम घाट:
संपूर्ण भारताचा विचार केला तर पश्चिम घाट हा गुजरात पासून केरळ पर्यंत पसरलेला आहे.
महाराष्ट्रात असलेल्या पश्चिम घाटाच्या रांगाना सह्याद्री पर्वत म्हणून संबोधले जाते. सह्याद्रीवर अनेक नद्या उगम पावतात. महाराष्ट्रातील जवळपास ७५ टक्के नद्या सह्याद्रीत उगम पावतात. तसेच कोकणात वाहणाऱ्या जवळपास सर्वच नद्या सह्याद्रीत उगम पावतात.
सह्याद्रीच्या पूर्व भागात उगम पावणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. तसेच सह्याद्रीच्या पश्चिम भागात उगम पावणाऱ्या नद्या पश्चिमेस अरबी समुद्राला जाऊन मिळतात.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी कृष्णा, भीमा, गोदावरी इत्यादी नद्या सह्याद्रीच्या पूर्व भागात उगम पावतात व सावित्री, उल्हास इत्यादी नद्या सह्याद्रीच्या पश्चिमेस उगम पावतात. यामुळे पश्चिम घाटाला किंवा सह्याद्री ला प्रमुख जलविभाजक म्हणतात.