India Languages, asked by kajalraipure214, 9 months ago

Please answer fast....
The first one to answer correct will be marked brainliest....​

Attachments:

Answers

Answered by pajuraut7406
2

Answer:

माझे बालपण हे एका छोट्याश्या गावात झाले. आम्ही गावातील सर्व मुले लहान असताना खूप मजा करायचो.

तसेच मी घरामध्ये सर्वात छोटा असल्यामुळे घरातील सर्व माणसे ही माझे खूप लाड करत असत. त्यावेळी लहान वयात विविध प्रकारचे खेळ खेळणे आणि फिरायला जेणे हीच प्रमुख कामे होत असत.

खरंच बालपणातील दिवस खूप गोड आणि मनोरंजक असतात. तसेच लहानपणी मी खूप खोडकर आणि चंचल असल्यामुळे मी कधी – कधी ओरडा सुद्धा खायचो.

परंतु तेवढच मला प्रेम आणि आपुलकी सुद्धा मिळत होती. मी लहान असताना दही चोरून खायचो. त्यामुळे आई माझ्यावर रागवायची.

मी लहान असताना अनेक खेळ खेळायचो. जसे की कबड्डी, खो – खो, धावणे, लंगडी, विटी दांडू इ खेळ खेळायचो. हे खेळ खेळत असताना कधी संध्याकाळ व्हायची समजायचं नाही. माझी आई मला ओरडायची की जेवण तरी वेळेवर करत जा. परंतु लहानपणी खेळ खेळत असताना भूक लागायची नाही.

Similar questions