India Languages, asked by pradnyesh105, 2 days ago

please answer in MARATHI
and long because it's for 10 marks.​

Attachments:

Answers

Answered by utkarshadesai000
1

Answer:

तंत्रज्ञान किमया.

Explanation:

तंत्रज्ञान हा शब्द जितका आज सर्वसामान्यपणे वापरला जातो, तितका पूर्वी वापरला जात नव्हता. हा इंग्रजीमध्ये क्वचितच वापरला जाणारा शब्द होता, जो उपयुक्त कला आणि तांत्रिक शिक्षण दर्शवण्यासाठी वापरला जात होता, परंतु आज तंत्रज्ञान हा शब्द प्रत्येक व्यक्तीच्या ओठांवर आढळून येतो.

तंत्रज्ञान म्हणजे कामे सोपी करण्यासाठी मशीन तंत्र साधने आणि विविध स्त्रोतांचा उपयोग होय, ह्या व्याख्याला अधिक सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर मानवी कामे अधिक सुलभ होण्यासाठी केला जाणारा विविध यंत्रांचा उपयोग. तंत्रज्ञानामुळे आपली कामे सोपी झाली, ज्यामुळे कामाचा वेग वाढला आणि आपल्यासाठी विकासाची दारे उघडी झाली.

आज जवळ जवळ सर्वच क्षेत्रात सर्वाधिक वापरण्यात येणारे तंत्रज्ञान म्हणजे संगणक. जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला दिसून येईल की, आपल्या दैनंदिन जीवनातील ८० % टक्के पेक्षा अधिक काम संगणकामुळे पार पडते, जसे की संपर्क साधने व्यावसायिक कामे करणे, पत्र पाठवणे संशोधनासाठी माहिती गोळा करणे आणि अधिक.

या यंत्रांचा वापर आपण केवळ कामे सुलभ करण्यासाठी करत नाही, तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या देशाच्या सुरकशा हेतूने देखील संगणकाचा उपयोग केला जातो.

विविध यंत्रांचा शोध तर पृथ्वीवर अगदी कित्येक वर्षांपासून लागत आला आहे, परंतु आपल्या आयुष्यात म्हणजेच मानवी आयुष्यात विकासाला तेव्हा पासूनवेग मिळाला, जेव्हापासून संगणकाचा शोध लागला. संगणकाच्या शोधामुळे तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती घडून आली आणि याचे मुख्य कारण ठरले, महान वैज्ञानिक चार्ल्स बॅबेज.

चार्ल्स बॅबेज हे मुळात एक गणित तज्ञ होते आणि गणिती संकल्पनेच्या आधारावर त्यांनी १८३३ ते १८७१ च्या दरम्यान संगणकाचा शोध लावला, परंतु चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा शोध लावण्याआधी संगणकाचा शोध लागला होता, परंतु चार्ल्स बॅबेज यांनी प्रोग्रामस च्या आधारे काम करणारा जगातील पहिला आधुनिक संगणक तयार केला, ज्यामुळे त्यांना आधुनिक संगणकाचे जनक असे देखील म्हटले जाते.

२१ व्या शतकापासून आतापर्यंत संगणकावर आधारित अनेक शोध लागले, जसे की मोबाईल, वाहने, विमान आणि अधिक. गाडी आणि विमान यांचे मूळ संगणकाला यासाठी मानले जाते, कारण आजकालच्या गाड्या आणि विमान ह्यातील तंत्रज्ञान संगणकावर आधारित आहे, जसे की ऑटोपायलट, म्हणजे चालक नसताना देखील संगणक प्रणालीच्या आधारावर गाडी चालू किंवा विमान चालू शकते.

आज सर्वजण तंत्रज्ञानाच्या मागे यासाठी लागलो आहेत, कारण जितके ऍडव्हान्स तंत्रज्ञान तितकाच देश विकसित मानला जातो, आज भारतात देखील विविध प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, परंतु ते इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याने भारताला विकसित देश मानले जात नाही.

तंत्रज्ञानामुळे जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल अगदी वेगाने घडत आहेत, जेथे पूर्वी दहा माणसे काम करत होती, तेथे आज केवळ एक यंत्र काम करत आहे, यामुळे वेळ पैसा ह्यांची बचत होत आहे, परंतु यामुळे अनेक लोकांचा रोजगार देखील जात आहे, यावरून आपल्याला असे समजते की, तंत्रज्ञानाचा फायदा तर आहे, पण सोबत नुकसान देखील आहे.

विश्व युद्ध पहिले, विश्व युद्ध दुसरे, याबद्दल तुम्ही कधी ना कधी ऐकले असेलच व त्याबाबत शाळेत शिकला देखील असाल, कारण विश्व युद्ध हा जगातील सर्वात असा भयानक काळ होता, ज्यामध्ये अनेक देश नष्ट झाले, तर लाखो लोकांनी आपले जीव सोडले, हे युद्ध मोठमोठी शास्त्रे आणि फौजेच्या बळावर लढली गेली होती, परंतु आजचा काळ पूर्णता विपरीत आहे, कारण आज युद्धशास्त्राच्या नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या बळावर युद्धे लढली जात आहेत.

तंत्रज्ञानाद्वारे लढले जाणाऱ्या युद्धात एक देश तंत्रज्ञानाचा वापर करून दुसऱ्या देशाची महत्त्वाची माहिती गोळा करतो किंवा चोरतो आणि त्याच माहितीच्या जोरावर विरोधी देशाचा पराभव देखील करतो, कारण माहितीमुळे आपल्याला विरोधकांची भविष्यकालीन चाल समजते आणि यासाठी मुळात संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, यावरून आपल्याला समजते की, देशाच्या संरक्षणार्थ देखील तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

हिरोशिमा आणि नागासाकी या हल्ल्याबद्दल तर संपूर्ण जगाला माहित आहे, हा हल्ला अमेरिकेने ६ ते ९ ऑगस्ट १९४५ च्या दरम्यान केला होता. या हल्ल्यात जपानचे हिरोशिमा आणि नागासाकी दोन्ही शहरे उद्ध्वस्त झाली होती, सोबतच लाखो लोक अपंग झाले, तर लाखो लोक मृत्यूमुखी पडले, ह्यानंतर जेव्हा विश्व युद्ध संपले, तेव्हा जपानने अधिक जोर तंत्रज्ञानावर दिला, ज्यामुळे आज जपान जगातील विकसित देशांच्या यादीत येतो हे सर्व तंत्रज्ञानाच्या सहाय्यामुळे घडून आले आहे.

You have to write a bit long since it is for 10 marks.

Hope it helps.

pls mark me as a brainalist

Similar questions