India Languages, asked by Anonymous, 6 months ago

please answer it fast ​

Attachments:

Answers

Answered by varadad25
5

Question:

पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून लिहा.

Answer:

१. 'अॉलिम्पिक व्हिलेज' वसवण्याची कल्पना इ. स. १९५६ मध्ये मांडण्यात आली.

१. ' ' = एकेरी अवतरण चिन्ह

२. . = पूर्ण विराम

२. “आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पायजे.”

१. “ ” = दुहेरी अवतरण चिन्ह

२. , = स्वल्पविराम

३. . = पूर्ण विराम

Explanation:

विरामचिन्हे:

भाषेत अनेक विरामचिन्हे विविध कारणांसाठी वापरली जातात.

जसे रस्त्यांमध्ये गतीरोधक असतात, तसेच भाषेतील विरामचिन्हे ही बोलताना शब्दांची गती व दोन शब्दांतील वा वाक्यांतील उच्चारण्याचा कालावधी निश्चित करतात.

विरामचिन्हे लेखनातही महत्त्वाची भूमिका बजावतात.

मराठी भाषेतील विरामचिन्हे:

१. पूर्णविराम ( . ):

एखाद्या विधानाच्या शेवटी विधान पूर्ण झाले आहे, हे दर्शविण्यासाठी पूर्णविराम वापरतात.

२. स्वल्पविराम ( , ):

एकाच गटातील अनेक शब्द मांडताना किंवा वाक्यात थोडेसे थांबायचे असेल तर स्वल्पविराम वापरतात.

उदा., गुलाब, मोगरा, जाई, जुई, इत्यादी अनेक फुले बागेत असतात.

मी काम संपवून आलोच, तू इथेच थांब.

३. अर्धविराम ( ; ):

दोन वेगवेगळी वाक्ये जोडण्यासाठी, वाक्यात 'पण', 'परंतु', 'तथापि', इत्यादी शब्द वापरले असता अर्धविराम वापरतात.

उदा., मी कामावर गेलो असतो ; पण माझी तब्येत ठीक नाही.

नेहमी वाचन करावे ; परंतु त्याचा अर्थही लक्षात घ्यावा.

४. प्रश्नार्थक चिन्ह ( ? ):

एखाद्या प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वापरतात.

उदा., भाषा म्हणजे काय ?

५. उद्गारवाचक चिन्ह ( ! ):

जेव्हा एखादी भावना किंवा आश्चर्य व्यक्त केले जाते, तेव्हा उद्गारवाचक चिन्ह वापरतात.

उदा., किती मोठी इमारत आहे ही !

६. एकेरी अवतरण चिन्ह ( '....' ):

एखाद्या वाक्यातील विशिष्ट शब्दाबद्दल सांगायचे असल्यास तो शब्द लिहिताना 'एकेरी अवतरण चिन्ह' वापरतात.

एखाद्या व्यक्तीच्या वा वस्तूचे काल्पनिक किंवा अवास्तविक शब्द लिहिताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.

उदा., आगऱ्याचा 'ताजमहाल' जगप्रसिद्ध आहे.

माझी गाडी मला म्हणाली, 'मी रोज रोज काम करून थकून जाते, मला सुट्टी हवी आहे!'

७. दुहेरी अवतरण चिन्ह ( “.....” ):

एखाद्याचे शब्द जेव्हा जशास तसे लिहायचे असतात, तेव्हा दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात.

उदा., राम म्हणाला, “मी उद्या गावाला जाणार आहे”.

८. संयोगचिन्ह ( - ):

वाक्यातील दोन जोडशब्दांमध्ये संयोगचिन्ह वापरतात.

उदा., राम - शाम, आई - वडील, पिता - पुत्र.

९. अपसारण चिन्ह ( – ):

अपसारण चिन्ह हे मोठे संयोगचिन्हच असते. एखाद्या शब्दाविषयी अधिक सांगण्यासाठी अपसारण चिन्ह वापरतात.

उदा., मी दिल्ली आपल्या देशाच्या राजधानीला गेलो होतो.

१०. विकल्प चिन्ह ( / ):

एकाच अर्थाचे दोन वेगवेगळे शब्द वापरण्यासाठी अथवा 'किंवा' या अर्थाने विकल्प चिन्ह वापरतात.

उदा., सर्वांनी वृत्तपत्र / वर्तमानपत्र वाचत रहावे.

Similar questions