please give answer
please its urgent
fast fast
in marathi
Answers
Answer:
विद्यार्थी - ( मैदानावरील कवायत घेत असलेल्या शिक्षकांना ) सुप्रभात सर.
शिक्षक - सुप्रभात सागर.
विद्यार्थी - मला तुमच्याशी पाच मिनिटे बोलायचे आहे. बोलू शकतो का?
शिक्षक - हो हो नक्किच. बोल काही अडचण आहे का तुला?
विद्यार्थी - नाही सर. काहीच अडचण नाही आहे. उलट मी तुम्हाला धन्यवाद करण्यासाठी आलो आहे.
शिक्षक - ते का बरे?
विद्यार्थी - सर, काल तुम्ही मला आपल्या शाळेच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन बनविले त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद मानत आहे.
शिक्षक - अरे सागर, त्या बद्दल धन्यवाद कशासाठी? अरे सर्वच विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही ही गोष्ट मान्य आहे की तु खूप चांगला खेळाडू आहेस. तुझी क्रिकेट या खेळातील पकड आणि कौशल्य आम्ही सर्वांनीच पाहिलेले आहे.
विद्यार्थी - हो सर. मला लहानपणापासूनच क्रिकेटची फार आवड होती आणि माझी ही आवड बघून माझ्या घरातून ही मला नेहमीच क्रिकेटसाठी प्रोत्साहन मिळत गेले आहे. त्यामुळे मी या खेळावर लक्ष केंद्रित करीत गेलो.
शिक्षक - हो ते लक्षात आले आहे माझ्या. तुझा खेळ बघून आणि तुझ्यातील नेतृत्वगुण बघूनच मी ठरविले की तु एक उत्तम कॅप्टन होऊ शकशील आणि आपल्या शाळेला आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवून देऊ शकशील.
विद्यार्थी - निश्चिचतच सर. मी माझ्या बाजूने आपल्या शाळेच्या क्रिकेट टीमच्या इतर माझ्या मित्रांना नेहमी एकत्र घेऊन कोणत्या ही क्रिकेट स्पर्धेत चांगलीच कामगिरी करून दाखविण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. आणि आपाल्या शाळेसाठी जास्तीत जास्त बक्षिसे मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.
शिक्षक - शाब्बास! मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. हो, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.
विद्यार्थी - काय सर?
शिक्षक - तु क्रिकेट टीमचा कॅप्टन झाल्यामुळे जरी तुझ्यावर मोठी जबाबदारी आलेली असली तरी ही तु अभ्यासाकडे मात्र अजिबात दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. कारण मला तुझी अभ्यासातील प्रगतीही चांगलीच झालेली बघायची आहे.
विद्यार्थी - नक्किच सर. मी माझ्या अभ्यासात ही तेवढीच मेहनत घेईन. तुम्ही निश्चिन्त राहा.
शिक्षक - ठीक आहे. तुला माझ्याकडून शालेय क्रिकेट टीमचा कॅप्टन बनल्याबदद्द्ल पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. मला आशा आहे की तुला दिलेले हे पद तु नक्कीच उत्तम प्रकारे भूषवशील.
विद्यार्थी - धन्यवाद सर.
आमचे हे वरील संवाद लेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.