Hindi, asked by brainlyhelps11, 1 month ago

please give me this answer of marathi ​

Attachments:

Answers

Answered by anujupadhyay987
1

Answer:

आई-वडील यांच्यानंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरू असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती देत असतात. विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही ते करत असतात. शिक्षकांकडून मिळालेली कौतुकाची थाप विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवते, त्यामुळे त्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासही मदत होते.

मी इयत्ता आठवीत असताना मला गणित विषयाची फार भीती वाटत असे. आमच्या गणित विषयाच्या शिक्षिका सौ. भिसे बाई यांनी एके दिवशी मला बोलावले व समजावले, की गणित हा विषय सरावाने छान जमेल तुला तुझं गणित अगदीच काही कच्चं नाही. तुला काही अडचण आलीच, तर तू कधीही मला विचार. त्यानंतर, मी नियमितपणे गणिताचा सराव केला. सौ. भिसे बाईंचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत होतेच. त्यानंतरच्या सहामाही परीक्षेत मी गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवले. त्यावर बाईंनी माझे संपूर्ण वर्गासमोर खूप कौतुक केले. अशाप्रकारे, भिसे बाईंमुळे माझी गणिताविषयी भीती कायमची दूर झाली. माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणूनच मला वाटते, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.

Explanation:

Please plz mark me as brainliest and follow

Similar questions