India Languages, asked by adityaborate08, 10 months ago

Please give Std. 10th maharashtra board Saskrit Chapter 1 Aadyakrushak pruthuvainya Translated in Marathi इयत्ता 10 वी महाराष्ट्र बोर्ड संस्कृत प्रथम पाठ आद्यकृषक: पृथुवैन्य: मराठी भाषांतर

Answers

Answered by borate71
43

Answer: plz see the attachment for Marathi Translation

Attachments:
Answered by franktheruler
2

संस्कृत प्रथम पाठ आद्यकृषक: पृथुवैन्य: मराठी भाषांतर

  • राजा पृथुवैन्य म्हणजे पृथ्वीवर अभिषिक्त झालेला सर्वप्रथम असा सम्राट . प्रयाग या ठिकाणी पृथु राजाची राजधानी होती. राज्याभिषेकाच्या वेळी भाट पृथुराजाची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते. तेव्हा पृशु राजाने आज्ञा केली "अरे, भाटांनो थांबावे ! जोपर्यंत माझे सद्गुण प्रकट होत नाहीत तोपर्यंत माझी स्तुती करणे योग्य नाही. स्तुती तर ईश्वराचीच होईल .स्तुती गाणारे पृथुराजाचा अशा प्रकारचा निरिच्छपणा जाणून प्रसन्न झाले.
  • एकदा पृथराजा आपल्या राज्यात फिरत होता. फिरत असताना त्याने पाहिले की प्रजा अतिशय दुर्बल आणि अशक्त आहे. ती प्रजा पशुप्रमाणे जगते आहे निकृष्ट असे अन्न खात आहे ते पाहून राजा चिंतातूर झाला तेव्हा पुरोहित म्हणाले, "हे राजा, धनधान्य आदि सर्व वस्तू खरे तर पृथ्वीच्या उदरातच आहेत.
  • ते मिळवण्यासाठी प्रयत्न कर तेव्हा पृथुराजाने त्यासाठी धनुष्य सज्ज केले. तेव्हा पृथ्वी स्त्रीरूप धारण करून त्याच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली, "हे श्रेष्ठ राजा! तुझे वडील वाईट शासनकर्ते वेनराजा यांनी राजधर्माचे पालन केले नाही. तेव्हा मी चोर लबाडांच्या भीतीमुळे धनधान्य, फुले, फळे माझ्या उदरात समाविष्ट केली. तू तर प्रजेच्या कल्याणासाठी तत्पर असा राजा आहे. जर तू प्रयत्नपूर्वक शेतीकाम केलेस तर मी प्रसन्न होईन म्हणून धनुष्य सोड. टिकाव, नांगर, कुदळी आणि विळे हातात घेऊन प्रजाजनांसोबत शेतीकाम कर भूमातेचा उपदेश लक्षात ठेवून पृशुवैन्याने नक्वांचा मार्ग अडवून शेतीकामासाठी पाण्याचा उपयोग केला.
  • पावसाचे पाणी साठवून पाण्याचे व्यवस्थापना केले. जमीन सुपीक करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर त्या ठिकाणी लोकांनी धान्याच्या बीजांची पेरणी केली. त्याने अनेक झाडांच्या विविधप्रकारच्या बीजांचे कष्टपूर्वक संकलन केले आणि निवड केली. त्यानंतर बोजांची प्रक्रिया करून पेरणी केली. पावसानंतर बीजांतून अंकुर फुटले आणि धान्यलाभ झाल्याने प्रजानन संतुष्ट झाले. असा हा कल्याणकारी, प्रशासनात अग्रेसर, जनसेवेचे व्रत घेतलेला पृथ्वीवरचा राजा होऊन गेला.

#SPJ2

Similar questions