Hindi, asked by kjjkk, 1 year ago

please give this answer it's important

Attachments:

Answers

Answered by abettersoul
1

Answer:

निसर्ग म्हणजे सृष्टी. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचतत्त्वांनी बनलेली सृष्टी. या निसर्गाचे व मनुष्याच नात अगदी त्याच्या जन्मापासूनचे असते. मनुष्याच जन्म याच निसर्गाच्या पंच तत्त्वातूनच होतो. व त्याच पंचतत्त्वात विलीन होतो. तेव्हा आपले व निसर्गाचे नात अतूट नाही का आहे. आपण या निसर्गात जन्म घेतो, वाढतो, व शेवटी विलीन होतो. आणि म्हणूनच या निसर्गाच जतन करणे ,पोषण करणे त्याची वृद्धी करणे हे आपले कर्तव्य आहे.

निसर्ग हाच आपला गुरु, हाच आपला मित्र व हाच आपला डॉक्टर सुद्धा आहे. निसर्ग आपणा करता खूप मोठा वरदान आहे. त्याच्या कडन आपणास आवश्यक सर्व घटक जस पाणी, राहण्यास घर व अन्न सुद्धा मिळते. निसर्गाकडून आपणास किती काही शिकायला मिळते. जस फूल काट्यात फूलते तस आपणही प्रत्येक संकटात हसत राहवे. झाडांप्रमाणे खंबीर उभ राहून नेहमी दुस-यांना मदद करणे. नदी जशी कितीही अडथडे आली तरी वाहते तसच आपणही सर्व कष्टानां न घाबरता सामोरे जाणे. आणखी बरच काही हा निसर्ग आपणास शिकवतो.

निसर्ग तर खरा चित्रकार आहे. किती रम्य चित्र तो रोज रंगवतो व आपणास प्रेरणा देतो. खोल द-या खो-या, निर्मळ झरे तलाव, रम्य अथांग सरोवरे, बेफाम समुद्र, घनदाट अरण्य, बर्फाच्छादित शिखरे, उतुंग पर्वत, कमळांनी भरलेली तळे, वां-याच्या झोक्यावर डोलणारी हिरवीगार शेते, नारळी केळांच्या बागा, डोंगरा आडून उगविणारा सूर्य व त्याची सोनेरी आकाशात गुलाल उधळणारी सूर्य किरणे. हे सर्व किती किती सूंदर आहे. आणि याचा अनुभव आपण रोज करतो.

येवढच नाही तर या निसर्गात समावतात ते वेगळे वेगळे ऋतू. हे निसर्गाचे ऋतुचक्र पण जाता जाता दु:खानंतर सुख येतेच असा संदेश देत जातात. रिमझिम पाउस व त्यामुळे उठणारा मातीचा सुगंध, तसेच थंड वा-याची झोका, व त्या बरोबर येणारा फुलांचा सुगंध, उन्हाळ्यात हीच झुळूक मनाला जीवाला किती मनमोहक वाटते. समुद्राच्या लाटा, पक्षीची किलबिल, सकाळची सूर्याची कोवळी किरणे, सूर्यास्ताच्या वेळीस तांबूस होत जाणारे आकाश, सर्व काही निसर्गाची किमया आहे. निसर्गाने आपणास दिलेले देणगी आहे.

निसर्ग आपणास जिवलग मित्रा प्रमाणेच काहीही न मागता देखील केवढ काही देतो. मग आपणही या निसर्गाला काहीतरी दिले पाहिजे न.

 वाढत्या आधुनिकरणा मुळे व वाहतुक पाणी प्रदूषणा मुळे निसर्गाचे सौंदर्य दिवसे न दिवस कमी होत आहे. आकाशातील चांदोबा उंच उंच इमारतीच्या मागे लपलेला आहे. जंगल तोड मुळे पाउस कमी पडत आहे. आणि यामुळे निसर्गाच्या भयंकर रूपाचे दर्शन आपणास घडत आहे. अतिवृष्टीने नदया नाल्यांना पूर येऊन शहरेच्या शहरे नष्टय होत आहेत. तर कधी भूकंपाने हजारो घरे जमीनदोस्त होत आहेत.

तेव्हा आपल हे कर्तव्य आहे कि निसर्गाचे संतुलन ठेवले पाहिजे कारण मनुष्याच व निसर्गाच अतूट नाते आहे. आणि निसर्ग हाच माझा सोबती, सखा व मित्र आह.

Hope it is helpful and do follow me and mark my answer as brainliest

Similar questions