India Languages, asked by Anonymous, 7 months ago

please please please answer it fast........​

Attachments:

Answers

Answered by rajethakar
0

Answer:

Explanation:

) स्वावलंबित्व आणि आत्मविश्वास :-यशस्वी माणूस स्वतःच्या प्रगतीसाठी इतरांवर कधीच अवलंबून राहात नाही. तो केवळ स्वतःच्या साधनांवर आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवत असतो. अनेक विद्यार्थ्याची तक्रार असते सर शाळेत नीट शिकवतच नाही. आमचे कोर्सेस पूर्ण करून दिले नाहीत. पुस्तकातील भाषा खूपच कठीण आहे. मला घरी अभ्यासाला जागाच नाही, मला वडिलांनी गाईडस्‌ घेऊन दिलेले नाही. पेपर आऊट ऑफ सिलॅबस होता, पेपर नीट तपासलेच नाहीत, आमच्या क्षमतेच्या मानाने कोर्स खूप कठीण आहे. अशी असंख्य कारणे अनेक विद्यार्थी सतत सांगत असतात.

स्वतःच्या अपयशाचं कारण सतत इतरांवर ढकलत राहतात आणि आयुष्यभर अशीच मनोवृत्ती घेऊन जगतात. प्रत्येक गोष्टीसाठी हे विद्यार्थी दुसऱ्यावर अवलंवून आहेत. शाळा, शिक्षक, पालक, सुविधा या सर्व बाबी मिळाल्या तरच मी यशस्वी होईल अन्यथा नाही. अशी मनोवृत्ती बाळगणारे लोक आयुष्यभर परावलंबी राहतात आणि एक क्षण असा येतो की तेव्हा इतर कुणीच मदत करू शकत नाही. आणि हे लोक नैराश्यात, हिनत्वाच्या भावनेत खितपत पडतात. आज महाराष्ट्रात असंख्य युवक असे आहेत ज्यांना स्वतःची नोकरी मिळवता येत नाही.

स्वतःचा व्यवसाय करता येत नाही. त्याचा सतत इतरांना प्रश्न असतो की काय करू? प्रत्येक जण त्यांना निरनिराळे सल्ले देतात. परावलंबी माणूस सल्ला देणाऱ्याच्याच गळयात पडतो. आता हे साध्य करण्यासाठी मला मदत करा' अशा वेळी सल्ला देणारे पळ काढतात आणि हा परावलंबी युवक दुसऱ्या सल्लागाराचा शोध घ्यायला लागतो. परावलंबी लोकांना स्वतःच मत नसतं. ते बिनबूडाच्या लोटयासारखे असतात. जिकडे ढकललं तिकडे कलंडले. बऱ्याचदा वर्तमानपत्रातून बातम्या वाचायला मिळतात की नोकरीचे आमिष दाखवून अनेक युवकांना लाखो रूपयांचा गंडा घातला. यात बळी पडणारे हेच परावलंबी युवक असतात.

आम्हाला नोकयाच मिळत नाहीत म्हणून युवक ओरडतात आणि दुसरीकडे आम्हाला चांगली माणसंच मिळत नाहीत म्हणून नोकया देणारे खंत व्यक्त करतात. यात दोष परवलंबी मनोवृत्तीचा आहे. स्वावलंबी माणसांना मात्र वरची एकही समस्या भेडसावत नाही. प्रत्येक गोष्ट तो स्वतःच्या सामर्थ्यावर करतो. स्वतःची स्वतंत्र साधने स्वतः निर्माण करतो. अपयश आलंच तर त्याची जबाबदारी स्वीकारतो. स्वतःच्या अपयशाचं परखड मूल्यमापन करतो. त्यावर चिंतन करतो. स्वतःच्या चुकांमधून त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात.

Similar questions