Please someone urgently help me....
Please send me a good essay of about one and a half fullscape papers on the topic माझा आवडता ऋतू - वसंत ऋतू... in marathi.
Please dont copy from internet....
And good answer I will mark as brainliest....
Answers
वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे.
महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. भगवान कृष्णाने गीतेत 'ऋतूनां कुसुमाकरः' असे संबोधले आहे. कवीवर्य जगदेव तर वसंताचे वर्णन करताना थकत नाहीत.
निसर्गाचे आकर्षण एरवी असतेच. पण वसंत ऋतूत त्याचे सौंदर्य जास्त खुलते. आपल्या या सौंदर्य विशेषाने तो आकर्षित करून घेतो. फक्त त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे.
नेहमीच्या धावपळीच्या जगतातून फुरसतीचे क्षण काढून निसर्गाकडे वळायला हवे. निसर्गाच्या माध्यमातून सतत चलित स्थितीत असणार्या देहाला आराम दिला पाहिजे. निसर्गाकडे एक अजब जादू आहे. त्यामुळे मानवी वेदनांवर त्याचा असा काही असर होतो, की सगळी दुःखे, वेदना पार विसरायला होतात. निसर्गाचे हेच सानिध्य कायम मिळत राहिले तर मग काय मानवी जीवनात बहारच येईल. सहाजिकच त्याचा परिणामही दीर्घकाळ राहिल.
निसर्गात अहंकाराचा लवलेश नाही. म्हणूनच तो ईश्वराच्या जवळ आहे आणि त्याचमुळे आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा ईश्वराच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो.
निसर्ग सुख आणि दुःखाच्या पलीकडे आहे. वसंत असो वा वर्षा वेगवेगळ्या मार्गाने ईश्वरच पृथ्वीवरून हात फिरवत असतो. आणि त्याच्या या चैतन्यदायी स्पर्शाने सृष्टी फुलून निघते.
जीवनात प्रभू स्पर्श झाला, त्याचा हात फिरला तर आपले जीवनही संपूर्णपणे बदलून जाईल. जीवनात वसंत येईल. दुःख, दैन्य, दारिद्र्य क्षणात दूर होतील. ईश्वराच्या स्पर्श झाल्यानंतर आयुष्यात फक्त एकच ऋतू येतो, तो म्हणजे वसंत.
निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यास शरीरात स्फूर्ती, मनात उत्साह आणि बुद्धीत चमक व ह्रदयात चेतना निर्माण होते. सर्व सृष्टी चेतनामय वाटू लागते. सृष्टीचे सौंदर्य चाखण्यासाठी दोन डोळेही कमी पडतात, असे वाटते. कदाचित म्हणूनच की काय या काळात विवाह समारंभ होतात आणि विवाह करून आणखी दोन डोळ्यांच्या सहाय्याने आपण या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत असू.
सृष्टीचे सौंदर्य आणि युवावस्था एकत्र येथे तिथून निराशा, निष्क्रियता, नीरसता हद्दपार होते. निसर्गाच्या सौंदर्यात व मानवी रसिकतेत ईश्वराचा स्वर न मिसळल्यास मानवी रसिकता विलासी जीवनाचा मार्ग पकडते आणि विनाशाच्या गर्तेत घेऊन जाते. म्हणूनच वसंताच्या संगीतात गीतेचा स्वर मिळायला हवा.