World Languages, asked by Kalpanamhatre, 10 months ago

please tell it in marathi
its urgent please

कोरोनावायरस एक सामाजिक समस्या या विषयावर 10 ते 15 ओळीत निबंध लिहा ​

Answers

Answered by bagulshreyas517
0

Answer:

write a composition on coronavirus in 10 to 15 sentences.

plss follow me

brainiest

Answered by kriaz1
1

Answer:

सध्या काही ठिकाणी हा आजार पसरत आहे. तिथे एका विशिष्ट धर्माला कारणीभूत मानले जात आहे. त्यामुळे धार्मिक तेढ वाढण्याची देखील शक्यता आहे. देशातील बऱ्याच भागांसोबत आदिवासी भागात देखील शहरातून येणाऱ्या लोकांना गावात प्रवेश दिला जात नाहीये. प्रवेश रोखण्यासाठी गावाच्या वेशीवर झाडे/काटे/ दगड टाकण्यात आलेले आहेत. आदिवासी भागात अंधश्रद्धा या पूर्वीपासून आहेत. त्यामध्ये भगता (गावचा पुजारी) तर्फे  असेल किंवा इतर कोणी बाबाच्या सांगण्यावरून एखाद्या संकटातून वाचण्यासाठी बळी देणे, एखाद्या व्यक्तीला संशयावरून गावाबाहेर काढण्याचा प्रकार होतात. या आजाराच्या बाबतीत देखील उलट सुलट चर्चांमुळे काही भागात असे प्रकार आढळून आले आहेत. यावर उपाय म्हणून स्वयंसेवी संस्थांकडून आणि शासनाकडून या भागामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.

सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची असणारी स्थिती आणि कोरोनाच संकट अत्यंत बिकट परिस्थितीला जन्म घालेल. लोकांना काही दिवसानंतर जर रोजगार भेटला नाही तर कोरोनापेक्षा उपासमारीने जीव गेल्याच्या घटना समोर येतील. आपल्याला पुतळ्यांपेक्षा, कुठल्याही नेत्यासाठी केलेल्या इव्हेंटपेक्षा हॉस्पिटल, सर्वांना घर, शिक्षण आणि अन्न अशा प्राथमिक गरजेच्या गोष्टींकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे. खेळत्या पैशाच्या अभावाने बाजारात आलेला स्थूलपणा आणि त्यातून वाढलेली बेरोजगारी, बँकेनी दिलेली कर्जाऊ रक्कम परत न आल्यामुळे बँकांचे निघालेले दिवाळे, शेअर मार्केटमधील उतार तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील रुपयाची घसरणारी किंमत, जीडीपीची सातत्याने होणारी घसरण या सर्व गोष्टी नोटाबंदीनंतर सातत्याने आपण पाहतोय. सध्याची भारतीय अर्थव्यवस्था दृष्ट चक्रात मध्ये सापडली  आहे. ज्यामुळे लोकांच्या हातात कामधंदा नाही, पैसे नाहीत, बँक बचत/ ठेवी नाहीत. नेमक्या या परिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हतबलता वाढत चालली आहे. या सगळ्याचा सारासार विचार केंद्र शासनाने करणे गरजेचे होते.

ग्रामीण भागातून शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतरित झालेला मोठा वर्ग आहे. सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेताना या वर्गाला देखील तेवढेच प्राधान्य द्यायला हवे होते आणि त्यानुसार अंमलबजावणी करायला हवी होती.  पण झाले मात्र याच्या विरुद्ध, २१ दिवसाच्या लॉकडाऊनच्या घोषणेत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये फक्त ४ तासांचा कालावधीमुळे या बहुसंख्य असणाऱ्या वर्गातील लोकांना जीवनावश्यक वस्तू/किराणामाल/पैसे इत्यादींची जमवाजमव करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. तर बरेच स्थलांतरित लोक आपल्या गावी पायी जाताना दिसत आहेत. किंबहुना यांच्यासह बरेच लोक हे अशा लॉकडाऊनसाठी तयार देखील नव्हते. आपल्या देशातील एकूणच वैज्ञानिक दृष्टीकोनाबद्दल अनास्था आहे.  लोकांना नेहमी वाटत राहते की काहीतरी जादू होईल किंवा चमत्कार होईल आणि सर्व ठीक होईल. यावर ते विश्वास ठेवतात. याचा प्रत्यय २२ मार्चच्या जनता कर्फ्यूच्या दिवशी आलाच. काही लोकांचा तर समज देखील झाला की, सर्वांनी थाळी/घंटा/टाळ्या वाजवल्या आहेत तर कोरोना आता संपुष्टात आला किंवा २१ दिवसाच्या बंदनंतर अगदी २२व्या दिवसापासून आपल्याकडे सर्व आलबेल होईल. यामुळे देखील बरेच जण सध्या परिस्थितीपासून गाफील आहेत.

Explanation:

it's for help you bcz it's my opinion if u don't understand plz tell me i will correct it and i will edit it.

I think I helped you

Similar questions