please write one short essay on majha aawdat prani . means write one short essay on my favorite animal in Marathi
Answers
HEY MATE !!!
The following essay is on DOG
तसे मला प्राणी फारसे आवडत नसत, मला प्राण्यांची थोडी भीतीच वाटत असे. पण आता एका प्राण्याची मला आजिबात भीती वाटत नाही तो म्हणजे, आमचा “ब्रूनो”.ब्रूनो हा आमचा माझा पाळीव कुत्रा आहे. तो जेमतेम १ वर्षांचा आहे,पण तो वाटतो ३ ते ४ वर्षांचा. मागच्या वर्षी माझ्या घराशेजारच्या परिसरात त्याचा जन्म झाला. दुर्देवाने काही दिवसात त्याच्या आईला एक गाडीने उडवले. बिचारी दोन पिल्ले आई शोधात होते. मला तसे प्राणी आवडत नसत, पण त्या दोन पिल्लांची अवस्था बघून मला आणि माझ्या मित्राला दया आली. आम्ही दोघांनी एक एक पिल्लू घरी आणले.
हलका तांबूस रंग, टपोरे डोळे, बघता क्षणीच तो घराच्या सर्वाना आवडला. त्याच्या ब्रूनो नावामागे हि एक गम्मत आहे. घरी आल्यावर त्याचे काय ठेवणार यावर चर्चा सुरु झाली. कोणी म्हणे टॉमी, तर कोणी म्हणे टायगर, मला काहीतरी वेगळं नाव ठेवायचे होते. एके दिवशी मी माझ्या एका आवडत्या इंग्रजी गायकाचे गाणे ऐकत होतो, त्याचे नाव आहे “ब्रूनो मार्स”. त्या क्षणी मी ठरवले, त्या चिमुकल्याला मी ब्रूनो म्हणणार. आई, बाबा, आजीला सुरवातीला थोडे अवघड वाटले, पण नंतर सवय झाली.
(NOT EXPERT IN THIS FIELD, PLEASE CORRECT THE GRAMMATICAL MISTAKES IF ANY)
I HOPE YOU'VE FOUND IT IMFORMATIVE!!
PLEASE MARK AS BRAINLIEST!