India Languages, asked by mastershiv129, 7 months ago

Pls guys send an essay according to above topic​

Attachments:

Answers

Answered by Priyu566
1

शाळेशी संबंधित ज्या अनेक गोड आठवणी असतात त्यातील एक महत्त्वाची आठवण म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन . दर वर्षाच्या शेवटी वार्षिक स्नेहसंमेलन होत असते . आमचे वार्षिक स्नेहसंमेलन दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या नंतर होत असे . या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . आणि या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्यातरी स्पर्धेत भाग घ्यायचाच असा एक नियम असतो . म्हणून या स्नेह संमेलनामध्ये सर्वच विद्यार्थी भाग घेतात .

विविध स्पर्धांचे आयोजन नीट पार पडावे यासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार केलेले असतात; व त्यांना जबाबदारी वाटून दिलेली असते . यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपली जबाबदारी अचूक पार पाडण्यासाठी धावपळ दिसून येते , कारण चांगली जबाबदारी पार पाडणाऱ्या ला गटाला संमेलनामध्ये शेवटी बक्षीस दिले जाते. पण बक्षीसापेक्षा काम करताना आलेला अनुभव आणि आनंद फार महत्त्वाचा वाटतो.

सांस्कृतिक स्पर्धा चालू असताना तर खूपच मजा येते. त्यामध्ये नाटक स्पर्धा ,गायन स्पर्धा , भाषण स्पर्धा यामध्ये विविध विद्यार्थी खूप तयारी करून सादरीकरण करतात . नाटक स्पर्धेत तर बऱ्याचदा काहीजण संवादच विसरून जातात . तेव्हा खूप मजा येते ;कारण बाकीचे विद्यार्थी त्याला 'बोल ना ,बोल ना ' 'म्हणून सारखं सांगत असतात पण तो मात्र गप्प बसतो.

स्नेहसंमेलनाचे आयोजन असते त्यावेळेला शाळेची स्वच्छता केली जाते. संपूर्ण शाळा व आजूबाजूच्या परिसराची सजावट केली जाते . काही विद्यार्थी व्यासपीठ सजवण्यासाठी शाळेतल्या कला शिक्षकांचे मार्गदर्शन घेतात . त्यानंतर सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्याध्यापक येतात व तयारी बघून जी शाबासकी देतात तेव्हा मात्र सगळा थकवा निघून जातो.

सर्व स्पर्धा संपल्यानंतर शेवटच्या दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला असतो . त्यावेळी पालकांनाही आमंत्रण दिलेले असते . आपल्या मुलांना बक्षीस मिळताना बघून पालकांना फारच छान वाटते. त्यावेळेसच कला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन भरलेले असते . तसेच वर्षभरात मुलांनी केलेले प्रकल्प, त्यांचे कलात्मक काम याचीही मांडणी करण्यात आलेली असते. या सर्व साहित्याची माहितीही मुलंच पालकांना सांगतात.

बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना आवडणारा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे भोजनाचा कार्यक्रम ह्या दिवशी शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छान छान पदार्थ बनवलेले असतात . आम्ही स्वच्छ हात घेऊन अन्नपूर्णा मातेचा भरपुर आशीर्वाद घेतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर आयुष्यभराच्या आठवणींचा खजिना घेऊन घरी जातो.

hope it helped you

mark me beainliest

and

follow me please

Similar questions