India Languages, asked by rosieliz, 17 hours ago

pls someone help me​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
43

अक्षदा शिंदे

१०२, शांतीकुंज, सोमवार पेठ,

पुणे- ४११००२.

दि. ३०. एप्रिल, २०१७

प्रिय सई,

सप्रेम नमस्कार.

परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. नेहमीप्रमाणे परीक्षा छानच झाल्या. ह्यावर्षी बाबांनी कबूल केल्याप्रमाणे, आम्हां सर्वांना महाबळेश्वरला नेले. मी, आई, बाबा आणि राघव आम्ही सगळेच २२ तारखेला निघालो.

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असणारे महाबळेश्वर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. त्याला नंदनवन का म्हणतात याचा प्रत्यय तेथे पोहोचताच येऊ लागतो. तुला माहीत आहे? महाबळेश्वर ही ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती.

महाबळेश्वरमध्ये निसर्गसौंदर्य अफाट आहे. विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडविक पॉईंट, वेण्णा तलाव, काटे पॉईंट, एलिफंट पॉईंट अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून सिंडोला टेकडीवरील सर्वांत उंच पॉईंटवरून महाबळेश्वरमधील सूर्योदय व सूर्यास्त बघणे नेत्रसुख आहे.

भारताच्या स्ट्राबेरी उत्पादनापैकी ८५% स्ट्राबेरी उत्पादन महाबळेश्वरमध्ये होते. त्यामुळे साहजिकच येथे आल्यावर आम्ही स्ट्राबेरीवर यथेच्छ ताव मारला. महाबळेश्वरमधील स्ट्राबेरी, रासबेरी, जांभळाचा मध तसेच, गुलकंद प्रसिद्ध आहे. अशा आल्हाददायक वातावरणात, ऊन्हाच्या झळांपासून दूर चार दिवस कसे गेले कळलेच नाही !

तू इथे असतीस तर तुलाही मी हट्टाने सोबत नेले असते. पुढची सहल आपण नक्की एकत्र करू. तुझा अभ्यास कसा सुरू आहे? इकडे सगळे मजेत आहेत. तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग. तुझ्या बघत आहे. पत्राची वाट

तुझी मैत्रीण,

Similar questions