plz answer if anyone knows tthe answers
Answers
Explanation:
please mark me brainilest
Question:
अ) खालील वाक्यांतील विशेषण ओळखा व त्याचे प्रकार लिहा.
१) हिरवीगार झाडे मनाला मोह घालतात.
२) रमाकडे सुंदर बाहुली आहे.
आ) खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा.
१) _______ गावाला जा. ( तुम्ही, आपण, तो )
२) _______ बाळाला मांडीवर घेतले. ( तिला, तिने, तिची )
Answer:
अ)
१) हिरवीगार झाडे मनाला मोह घालतात.
विशेषण: हिरवीगार
विशेषणाचा प्रकार: गुणवाचक विशेषण
२) रमाकडे सुंदर बाहुली आहे.
विशेषण: सुंदर
विशेषणाचा प्रकार: गुणवाचक विशेषण
________________
आ)
१) तुम्ही गावाला जा.
२) तिने बाळाला मांडीवर घेतले.
Explanation:
अ)
१) हिरवीगार झाडे मनाला मोह घालतात.
या वाक्यात विशेषण हे 'हिरवेगार' आहे.
हिरवेगार हा शब्द झाड या नामाविषयी अधिक माहिती देतो.
झाडे कशी आहेत? असा प्रश्न विचारला तर उत्तर 'हिरवेगार' येते.
जेव्हा एखाद्या विशेषणाला कसा / कसे / कशी ने प्रश्न विचारला असता येणारे उत्तर हे विशेषणच असेल, तर ते विशेषण गुणवाचक विशेषण असते.
म्हणून, हिरवेगार हे विशेषण असून विशेषणाचा प्रकार गुणवाचक आहे.
२) रमाकडे सुंदर बाहुली आहे.
या वाक्यात सुंदर हे विशेषण आहे.
सुंदर हा शब्द बाहुली या नामाविषयी अधिक माहिती देतो.
बाहुली कशी आहे? असा प्रश्न विचारला तर उत्तर 'सुंदर' येते.
जेव्हा एखाद्या विशेषणाला कसा / कसे / कशी ने प्रश्न विचारला असता येणारे उत्तर हे विशेषणच असेल, तर ते विशेषण गुणवाचक विशेषण असते.
म्हणून, सुंदर हे विशेषण असून विशेषणाचा प्रकार गुणवाचक आहे.
_________________
आ)
१) तुम्ही गावाला जा.
या वाक्यात क्रियापदानुसार कर्ता वापरायचा आहे.
जर वाक्यात अयोग्य कर्ता वापरला, तर वाक्य अर्थहीन बनते.
जसे,
१. आपण गावाला जा.
२. तो गावाला जा.
पहिल्या वाक्यात आपण या कर्त्यासाठी जाऊ हे क्रियापद वापरावे लागते. पण वाक्यात दिलेले नसल्याने, आपण हे उत्तर चूक आहे.
दुसर्या वाक्यात तो या कर्त्यासाठी जातो हे क्रियापद वापरावे लागते. पण वाक्यात दिलेले नसल्याने, तो हे उत्तर चूक आहे.
दिलेले वाक्य हे आज्ञार्थी वाक्य आहे.
आज्ञार्थी वाक्याचा कर्ता नेहमी मध्यमपुरुषी असतो.
म्हणून, तुम्ही हे उत्तर बरोबर आहे.
२) तिने बाळाला मांडीवर घेतले.
दिलेले वाक्य हे भूतकाळातील आहे.
भूतकाळी वाक्यात नेहमी कर्त्याची द्वितीया विभक्ती वापरावी लागते.
'ती' या सर्वनामाची द्वितीया विभक्ती 'तिने' आहे.
म्हणून, तिने हे उत्तर बरोबर आहे.
तसेच, वाक्यात तिला किंवा तिची हे कर्ते वापरले तर वाक्य अर्थहीन बनते. म्हणून, हे दोन्ही पर्याय वगळून तिसरा पर्याय 'तिने' वापरावा लागतो.