India Languages, asked by tanishka2606, 11 months ago

Plz give a very short book review of

ANY BOOK in MARATHI !!!

ONLY IN MARATHI!
Plz it's urgent...​

Answers

Answered by jahanvi4877
8

Answer:

आप्त -अनिल अवचट (APTA -Anil Avchat)

पुस्तकाचे नाव: आप्त -अनिल अवचट

प्रथम आवृत्ती: १मे १९९७

मौज प्रकाशन ,किंमत:१६०

पृष्ठसंख्या:१६४

अवचटांनी वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये पूर्व प्रसिद्धीस आलेल्या व्यक्तिचित्रांच्या लेखांचे संकलन म्हणजे "आप्त" हे पुस्तक होय. एकूण आठ व्यक्ती वर्णनं आहेत ह्या पुस्तकात. सगळी खासंच . प्रवाही भाषेत लिहीलंय. कुठलीही अलंकारिक,अवजड भाषा नाही. प्रत्येक व्यक्तीबद्दल वाचून झाल्यावर अरेरे आपण का नाही ह्या व्यक्तीला भेटलो असं वाटत राहतं,आणि अश्या वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असत्या तर काय बहार होती असाही वाटतं .

तीन व्यावसायिक,मिनिता सांतिझो ,जेपी ,मारुतराव सरोदे ,विनायकराव,पाटीलसाहेब दोन गुरु,क्लासो अशी एकाहून एक सर्रास माणसं आपल्याला ह्या पुस्तकरूपाने भेटतात व अवचट आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात.

घाटग्यांचा चिवडेवाला,अमेरिकेतली मिनिता ,जेपी,अवली वैज्ञानिक सरोदे अफाट वाचन व ज्ञान असलेले विनायकराव ,पाटील नावाचे कर्तव्यनिष्ठ व जबरदस्त पोलीस ,आगाशांसारखा हौशी व निष्ठेचा योग्य शिक्षक व शेवटी अवली वल्ली क्लासो ह्या सगळ्यांनी हे पुस्तक वाचनीय केलंय .

व्यक्तिचित्रांची आवड असलेल्यांची चुकवू नये असं पुस्तक.

प्रशांत मयेकर

Similar questions