Plz give Correct answer
I will mark him brain list
give answer in marathi
Answers
Answer:
निबंध हा आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार आहे.[१] निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत." नि+बन्ध = बांधणे "असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.[२] निबंध हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे.
निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. रावसाहेब गणपतराव जाधव यांच्या मराठी विश्वकोशातील मतानुसार," लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होत".[१] यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोणांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते.
निबंध या शब्दाचा अर्थ सांगतांना ज्येष्ठ समीक्षक मो.रा.वाळंबे म्हणतात' "निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे." निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणाऱ्या विचारांची. एखादा विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसऱ्याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार निबंधामुळे एकत्रित होतात.[३]
कलाक्षेत्रात संकल्पना अथवा विषयांच्या निबंधस्वरूप मांडणीसाठी लेखनापलीकडे जाऊन चित्र, छायाचित्रे, ध्वनी, संगीत, वृत्तचित्र (डॉक्युमेंटरी), अनुबोधपट, ही माध्यमेही वापरली जात