Plz Give Me Answer Brainly Of Marathi Patra Lekhan
Answers
,hope it will help u
mark me as brainliest plzz
■■शाळेसमोरच्या रस्त्यावरील कचराकुंडी हटवण्याबाबत महानगर पालिकेच्या आरोग्य खात्याला लिहिलेले पत्र■■
रजनीश शर्मा.
एस. के. स्कूल,
नागरिक गार्डन,
मुंबई.
दिनांक : २७ मार्च, २०२०.
प्रति,
माननीय आरोग्य अधिकारी,
आरोगय विभाग,
महानगरपालिका.
मुंबई.
विषय : शाळेसमोरच्या रस्त्यावरील कचराकुंडी हटवण्याबाबत.
महोदय,
मी रजनीश शर्मा, एस. के. स्कूलचा विद्यार्थी प्रमुख या नात्याने तुम्हाला हे पत्र लिहत आहे. पत्र लिहिण्यामागचे कारण असे आहे की, आमच्या शाळेसमोरील रस्त्यावरच्या कचराकुंडीच्या दुर्गंधीचा त्रास आम्हा सगळ्या विद्यार्थी, शिक्षक आणि इथे राहणाऱ्या इतर लोकांना होत आहे.
या कचराकुंडीमुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंध तर पसरतोच,तसेच यावर मच्छर व उंदीर वावरतात,ज्यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते.तसेच सफाई कर्मचारी कचराकुंडीच्या खाली पडलेला कचरा कधीकधी नीट उचलत नाही, ज्यामुळे तो तसाच रस्त्यावर पडून राहतो.
कृपा करून ही कचराकुंडी हटवण्यासाठी तुम्ही सोय करावी तसेच कचरा व्यवस्थापनासाठी इतर मार्ग त्वरित काढावा.
तसदीबद्दल क्षमस्व!
तुमचा विश्वासू,
रजनीश शर्मा.
(विद्यार्थी प्रमुख)