Hindi, asked by study78612, 3 months ago

plz someone fast tell a essay in marathi on 'माझा आवडता त्ऋतू ' any one summer or winter plz now​

Answers

Answered by surudevi5
1

Answer:

पावसाळा ऋतु

आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. या सर्व ऋतूंमध्ये माझा आवडता ऋतू पावसाळा. " येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा" असे गाणे म्हणत म्हणत आणि पहिल्या पावसात खेळायचो. जुन महिना सुरू झाला आणि पावसाळा आला असे समजावे. विज कडाडते, ढग गडगडतात आणि मग थंब थेंब पडायला लागतात.

हल्ली 7 जूनला सुरू होणारा पावसाळा कधी जुलै तर कधी ऑगस्ट महिन्यात सुरू होतो. या पैसा मागे धावणारा माणूस आणि त्यामुळे पूर्ण पर्यावरणाचा तोल ढासळला. दरवर्षी ७जून ला पावसाळा सुरू व्हायचा आता मात्र पावसाळा सुरुवात होण्याची वेळ चुकली .

"सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय

"सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल कायशाळेभौवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. "

पावसाचा आनंद अगदी वेगळाच, पाऊस सुरू होण्याआधी उन्हाळ्याच्या गरमीने संपूर्ण जमीन तापलेली असते. लोक गरमीने येणाऱ्या घामाने अस्वस्थ झालेले असतात आणि ढगांकडे पाहू लागतात सगळ्यांचा मनात एकच इच्छा असते ती म्हणजे पाऊस कधी सुरू होतो आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरवतो.

रिमझिम पावसाळा सुरू होताच त्या पावसात पडल्याने सर्वीकडे झाडे हिरवीगार होतात. गर्मीने तापलेल्या वातावरणात गारवा निर्माण होतो. पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी धो धो कोसळतो सर्वत्र अाटलेल्या नद्या नाले तलाव यांना पुन्हा पाणी येते. शेतीच्या कामाला सुरुवात होते पावसामुळे शेतकरी खुश होतात . काही महिन्यात शेतात पीक डोलू लागते या पावसावरच शेतकरी त्याची शेती करतो त्या पावसावर तो जगतो जशी पिक जगतात.

पावसात शाळेत जाताना खूप मज्जा येते ती मजा तर खूप वेगळी असते . मला शाळेत जाण्यासाठी माझे वडील रेनकोट घेऊन देतात .मला पावसात जायला आवडते आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडतो . पाऊस कधीकधी इतका पडतो की सगळीकडे पाणीच पाणी साचते आम्हाला शाळेला सुट्टी मिळते .

हे निबंध सुधा जरूर वाचवे:-

हे निबंध सुधा जरूर वाचवे:-माझा आवडता ऋतू हिवाळा

हे निबंध सुधा जरूर वाचवे:-माझा आवडता ऋतू हिवाळाअचानक आलेला पाऊस

पावसात इंद्रधनुष्य बघायला मिळतो तो खूप छान दिसतो . सर्व ठिकाणी बेडूक ओरडतात. ढगांचा आवाज झाला की मोर रानात नाचतो. या पावसाचा आनंद घेतो पण मी कधी प्रत्याक्षात पाहिले नाही पण वाचले आहे आणि टीव्हीवर मोबाईलवर आता पाहिले आहे. सध्या व्हिडिओ बनवलेले असतात मोबाईल वर पाहिले. खरोखर प्रत्यक्षात अजून पाहिले नाही. पाऊस पडतो तेव्हा मोर रानात नाचू लागतो मला तो नाच बघायला नक्की आवडेल.

पावसामुळे आम्हाला शाळेला सुट्टी मिळते. गर्मीने तापलेले वातावरणात थंड होते. आम्हाला पावसात खूप मज्जा करायला मिळते . म्हणून मला पावसाळा ऋतु खूप आवडतो आणि पावसामुळे शेतकरी शेती करतो आणि शेतकरी ने केलेली मेहनत यामुळे शेतीचे उत्पन्न मिळते त्यावर आपण जगतो. भारत अजूनही एक शेती प्रधान देश आहे, भारतातील ६७% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने शेतीवर अवलंबून आहेत. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात मान्सून हंगामावर म्हणजेच पावसावर अवलंबून आहे.

पाऊस म्हणजे निसर्गाची एक अजब देणच आहे. माणसांना, पशु-पक्षांना , झाडे -वेलींना पाण्याची फार गरज असते, ती गरज पावसामुळे भरून येते. पावसाळा लाखो लोकांना उपजीविकेचे साधन देतो. अन्न हे आपल्या जीवनाची गरज आहे. त्यामुळे पावसाळा ऋतु मला खूप खूप आवडतो.

तर मित्रांनो हा होता माझा आवडता ऋतू मराठी निबंध,Maza Avadata Rutu In Marathi एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.

Explanation:

please mark as brainlist and follow and give some thanks as well please

Answered by vedantpatil892
3

आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. या सर्व ऋतूंमध्ये माझा आवडता ऋतू म्हणजे हिवाळा !हिवाळ्याच्या दिवसात उबदार पांघरुणात झोपायला फार मजा येते; पण त्याचवेळी रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांचीही आठवण येते. हिवाळा हा स्निग्धतेचा, प्रेमाचा ऋतू आहे. म्हणून या दिवसात अनेक स्नेहसंमेलने साजरी होतात.

पावसाळ्यात भरपूर पाणी मिळाल्याने या ऋतूत निसर्ग तृप्त असतो. त्यामुळे भोवतालची सृष्टी नयनरम्य असते. या दिवसात पहाटे सर्वत्र धुके पडते. अशा वातावरणात अनेकजण उबदार गरम कपडे घालून सकाळी भटकायला निघतात. याच ऋतूत पक्षी स्थलांतर करतात.

हिवाळ्यात नाताळ हा सण येतो. सांताक्लॉज वेगवेगळ्या भेटी देतो. शाळेलाही सुट्टी असते. याच ऋतूत मकरसंक्रांत येते. हा सण मला फार आवडतो. सर्व माणसे एकत्र येतात. तिळगूळ एकमेकांना वाटतात. संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू करतात. उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ या ऋतूला आवश्यक असतात. हिवाळ्यात काम करायला उत्साह वाटतो. या ऋतूत शेतावर हुर्खापार्टी होते. गावोगावी जत्रा भरतात. असा हा आपुलकी वाढवणारा ऋतू मला फार आवडतो.

मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो

Explanation:

hope you get it

Similar questions