India Languages, asked by ajaynayak1029, 1 year ago

Plzz answer कचरा कुंडी हटवण्या बद्दल आरोग्य खात्याचे आभार मानणारे पत्र लिहा ​

Answers

Answered by rajraaz85
55

Answer:

दिनांक: ३ जानेवारी, २०२२

प्रति,

मा.आयुक्त, आरोग्य विभाग,

सातारा महानगरपालिका,

सातारा-६५०९६३

विषय- कचराकुंडी हटवल्या बद्दल मनापासून आभार

माननीय महोदय,

आमच्या विभागातील कचरा कुंडी हटवल्या बद्दल सर्वात अगोदर आमच्या सर्व विभागातील जनतेकडून तुमचे खूप खूप आभार. मागील काही महिन्यापासून महानगरपालिकेच्या प्रस्तावावरून आमच्या विभागातील चौकामध्ये एक मोठी कचराकुंडी ठेवण्यात आली होती. कचराकुंडी मुळे परिसर स्वच्छ जरी होत असला तरी ठेवलेल्या कचराकुंडीमुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत होती. कचराकुंडी ठेवलेल्या जागेवर व्यवस्थित कचरा टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे भरपूर लोक बाहेरच कचरा फेकत होते आणि त्यामुळे परिसर अधिकच अस्वच्छ होत होता.

आमच्या विभागाच्या वतीने मी यापूर्वीही आरोग्य अधिकाऱ्यांना तसेच संबंधित अधिकाऱ्याला महानगरपालिकेत येऊन तक्रार नोंदवली होती. पण मागील सहा महिन्यापासून तक्रार करून देखील ती कचराकुंडी तिथेच असल्यामुळे आम्हा सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला होता.

आपण सेवेत रूजू झाल्या झाल्या आमच्या दिलेल्या तक्रारीची दखल घेत या विभागातील अनावश्यक कचराकुंडी हटवल्या मुळे आमचा परिसर पुन्हा सुंदर झाला व दुर्गंधीमुळे होणाऱ्या त्रासापासून आम्ही सर्वे वाचलो. आपण दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि केलेल्या कामामुळे आम्ही सर्व खरंच खूप मनापासून आभारी आहोत.

खूप खूप धन्यवाद!

आपला विश्वासू,

अजय पाठक

[email protected]

Answered by gsoni1698
0

Answer:

pahela wala answer

Explanation:

wo answer right hai

Similar questions