India Languages, asked by rutujakudnar, 6 months ago

police acchi atmavrutta nibandh Marathi​

Answers

Answered by arunachavan6824
18

Explanation:

मी पोलीस बोलतोय

''सद्रक्षणाय खलनिग्रहणाय''

असंख्य मागण्या अपूर्ण असूनही सत्तावन्न वर्षांत एकदाही एक तासाचा संप नाही की काम बंद आंदोलन नाही. ( स्वतंत्र भारतातही पोलीसांना संपाचा अधिकार नाही. ) अव्याहत कार्यमग्न.. दिवाळी असो वा दसरा.. ईद असो वा बुध्दजयंती.. सगळे सण रस्त्यावरच साजरे होतात आमचे... सरकार बदलले की धोरणे बदलतात. सर्वांत जास्त फटका बसतो तो पोलीस खात्याला.. पण दाखवता येत नाही की सांगता येत नाही..

भ्रष्टाचार हा समर्थनीय नाहीच.. असे असतानाही भ्रष्टाचार सर्वच खात्यांतून होतो.. पण तरीही सगळ्यांच्या नजरेत येतो तो.. रस्त्यावरील पोलीस... बरं भ्रष्टाचार काही एका बाजूने होत नाही. दिले जाते म्हणून घेतले जाते. देणारा हा काही उगाच देत नाही.. कोणत्यातरी अपराधातून सोडवून घेण्यासाठीच देतो.. देणाराच नंतर बोंब मारतो की पोलीस भ्रष्टाचारी आहेत.. अरे मग पाळ की कायदे आणि नियम.. अडकणारच नाहीस कशात.. मग देण्याची वेळच येणार नाही.. घेणारा हा दोषी आहेच पण देणारा दोषी नाही का? दहा वीस सेकंद सिग्नलवर थांबण्याचा संयम नसणारा उपटसुंभ आठ दहा तास ट्रॅफीक मॅनेज करत असलेल्या पोलीसाला शहाणपण शिकवतो.. कधी मनातल्या मनात तर कधी जाहीरपणे. कर्णकर्कश गोंगाटात, प्रचंड प्रदुषणात उभा असलेला पोलीसाची कोणी कधी आपुलकीने विचारपूस करत नाहीत की कोणी एखादी गार पाण्याची बाटली आणून देत नाहीत.. देतात त्या फक्त शिव्या.. आणि त्या का कशासाठी याचे तर्कशुद्ध उत्तर एकाकडेही नाही.

कायदे नियम पाळण्यापेक्षा ते मोडण्यातच आपल्याकडील लोकांना भुषण वाटते आणि यावर कडक भाषेत जो पोलीस बोलतो वा समज देतो त्याला म्हणतात की याला वर्दीची मस्ती आहे.. वाह.. रे.. चोर तो चोर वर शिरजोर..

कधी कुठे बंदोबस्तासाठी जावे लागेल, बदली होईल, सांगता येत नाही. नेहमीची ट्रेन चुकली तर मानसिक त्रास करून घेऊन दिवसभराचे वेळापत्रक बिघडवून घेणार्‍या लोकांनी एकदा विचार करावा की ड्यूटी संपताच पून्हा ड्यूटी लागणार्‍या पोलीसाला कसं वाटत असेल?

हे सर्व आज मांडण्याचं कारण म्हणजे...

आज एक दिडशहाणा चौबलसीट दुचाकीस्वार चौकातल्या एका पोलीसाला काही कारण नसताना अपशब्द बोलला.. त्या कार्यमग्न पोलीसाला ऐकायलाही गेले नाही पण मी शेजारीच असल्याने मी व्यवस्थित ऐकले.. त्याला बाजूला घेतले.. त्याच्याकडे लायसन्स नाही, गाडीची कागदपत्र नाहीत, हेल्मेट नाही.. असे असतानाही हा पोलीसाला शिव्या देतो.. वर निर्लज्जपणे शंभर रूपये देऊ करतो... कोणालातरी वकीलीकरण्यासाठी ( खरंतर दबाव टाकण्यासाठी ) फोन लाऊन घ्या बोला म्हणतो.. तेथील उपस्थित अधिकार्‍यांकडून रितसर पावती फाडली तेव्हा त्यास समजले.. की कायदा काय असतो.

जेथे ही घटना घडली ते माझे कार्यक्षेत्र नाही. पण एका पोलीसाला काहीही कारण नसताना बोलणारा का सहन करावा? पोलीस आहेत म्हणूनच महाराष्ट्र सुरक्षित आहे. अर्थात महाराष्ट्र सुरक्षित राखणे हे पोलीसांचे कर्तव्यच आहे. पण नागरिकांनीही आपली जवाबदारी व कर्तव्य ओळखून वागायला हवे. उपदेशाचे डोस दुरर्‍याला पाजताना आपण कसे वागत आहोत हेही तपासून पहावे.

आपल्याच देशात एक व्यक्ती म्हणाला होता काही काळासाठी "पोलीस हटवा.. या देशाला पाकिस्तान बनवतो की नाही ते पहा.."

ही आहे पोलीसांची ताकद आणि उपयुक्तता..

Answered by XxitsmrseenuxX
46

Answer:

Similar questions