Practical no. 1 उद्योगांचे सवंर्धन आणि प्रोत्साहन करण्यासाठी प्रमुख कायदेशीर तरतुदींचा व नियमांचा चिकित्सक अभ्यास करणे.
Answers
Answer:
उद्योग’ ह्या संज्ञेत प्रचलित अर्थाने अनेक आर्थिक व्यवहारांचा समावेश होतो. परंतु औद्योगिक अर्थशास्त्रात उद्योग ह्या शब्दाला मर्यादित अर्थ आहे. ह्या संदर्भात उद्योग म्हणजे ज्या उत्पादनसंस्थांत नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा पुढील उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त, असा एकच प्रकारचा माल निर्माण केला जातो, अशा उत्पादनसंस्थांचा समूह. या अर्थाने उद्योग ह्या संज्ञेत उपभोग्य व उत्पादक वस्तूंचे उद्योग, कुटिरोद्योग, लघुउद्योग व हस्तव्यवसाय ह्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर ह्या व्यापक वर्गीकरणातील प्रत्येक प्रकारच्या उद्योगातसुद्धा अनेक उद्योग आहेत. उत्पादनसंस्था व उद्योग ह्यांतील फरक स्पष्ट करणे जरूर आहे; उद्योग म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तू निर्माण करणाऱ्या अनेक उत्पादनसंस्थांचा समूह. उदा., कापड उद्योग आणि या संदर्भात उत्पादनसंस्था म्हणजे कापड कारखाना.