Pradeshik itihas lekhnala chalna mirali
Answers
Answer
ही भारतीय साहित्यविषयक विविध उपक्रम व कार्ये अमलात आणणारी, भारतातील राष्ट्रीय पातळीवरची प्रमुख साहित्यसंस्था आहे. १२ मार्च १९५४ रोजी नवी दिल्ली येथे ही साहित्यसंस्था स्थापन झाली. ही केंद्र शासनाच्या अखत्यारीखालील स्वायत्त स्वरूपाची संस्था असून तिला भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे पूर्णतः आर्थिक अनुदान दिले जाते. १९५६ मध्ये साहित्यसंस्था म्हणून तिची अधिकृत नोंदणी झाली. भूतपूर्व पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. या अकादेमीचे प्रमुख कार्य भारतातील साहित्यविषयक पूर्वसंचिताचे जतन करून, नवीन स्वतंत्र तसेच अनुवादित वाङ्मयाच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे, हे आहे. अकादेमी विविध प्रादेशिक भाषांतील लेखकांना उत्तेजनार्थ पारितोषिके व मानचिन्हे देऊन गौरवीत असते. प्रकाशने, अनुवाद, परिसंवाद, कार्यशाळा, देशाच्या विविध भागांत साहित्यमेळाव्यांचे आयोजन, लेखकांच्या वाचकांशी भेटी घडवून आणणे, असे नानाविध प्रकारचे उपक्रम राबवून त्यांद्वारे भारतीय साहित्याच्या अभिवृद्घीस व विकासास चालना देणे, हे या संस्थेचे उद्दिष्टानुसारी प्रमुख कार्यक्षेत्र आहे. अकादेमीच्या वतीने प्रकाशनांचा विस्तृत व विविधस्वरूपी कार्यक्रम राबविला जातो. भारतीय भाषांतील समकालीन वाङ्मयाची सूची तयार करणे, समकालीन लेखकांच्या उत्कृष्ट व निवडक साहित्यकृतींचे संग्रह प्रकाशित करणे, आधुनिक भारतीय भाषांतील वाङ्मयाचा इतिहास व विकास यांचा विस्तृत आढावा घेणारे प्रमाणभूत ग्रंथ इंग्रजी व हिंदी भाषांत तयार करून घेऊन ते प्रकाशित करणे, प्राचीन संस्कृत महाकाव्ये व पुराणे यांच्या सटीप आवृत्त्या प्रसिद्घ करणे इ. अनेक योजना व उपक्रम अकादेमीने आजपावेतो राबविले आहेत. भारतीय भाषांचे इतिहास प्रकाशित करून भारतातील प्रमुख भाषांच्या विकासाला उत्तेजन देणे व त्यांना जास्तीत जास्त परस्परांच्या सान्निध्यात आणणे, हे उद्दिष्ट अकादेमीने साध्य केले आहे. ‘आपल्या देशातील विविध भाषांचा परिचय सर्वांना असणे शक्य नाही; परंतु भारतातील प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने आपल्या भाषेतील ज्ञानाबरोबरच इतर भाषांतील साहित्याची माहिती करून घेण्याची इच्छा ठेवली पाहिजे. इतर भाषांत लिहिलेल्या ग्रंथांचा, तसेच प्रसिद्घ पुस्तकांचा परिचय करून घेतला पाहिजे व या प्रकारे आपल्या व्यक्तिमत्त्वात भारतीय संस्कृतीचा विशाल व उदार दृष्टिकोण आणि बहुभाषिक प्रेरणा वृद्घिंगत केली पाहिजे’.–पं. नेहरुंच्या या उद्गारांमध्ये साहित्य अकादेमीच्या कार्याची उद्दिष्टे नेमकेपणाने प्रतिबिंबित झाली आहेत. ह्या प्रक्रियेला मदत म्हणून साहित्य अकादेमीने भारतातील प्रादेशिक भाषांमधील प्रसिद्घ पुस्तकांचे इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची व विविध भारतीय भाषांचे इतिहास प्रसिद्घ करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. अकादेमीच्या या प्रयत्नांमुळे आपल्या मातृभाषेतून अन्य विविध भारतीय भाषांतील साहित्याचा आस्वाद घेणाऱ्या वाचकांच्या साहित्यिक-सांस्कृतिक ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचे, त्या अधिक सखोल करण्याचे आणि भारतीय विचार व साहित्य यांच्यामागील एकात्म पार्श्वभूमीचे त्यांचे भान जागृत करण्याचे अकादेमीचे उद्दिष्ट बव्हंशी साध्य झाले आहे.