pradushan ek samasya in marathi
Answers
प्रदूषण पुष्कळ प्रकारचे असते. काही ठळक प्रदूषणात वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, माती प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, रेडिओधर्मी प्रदूषण इत्यादी चा समावेश होतो. अलीकडे प्रदूषणाच्या समस्येने जिकडे तिकडे नुसते थैमान घातले आहे. प्रदूषणाची समस्या एखाद्या राक्षसासारखी डोकाउ लागली आहे. प्रत्येक देश ह्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध उप्रक्रम राबविण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. हि एक वैश्विक समस्या बनलेली आहे.
प्रदूषणाची समस्या फक्त मानवी जीवनालाच भेडसावत आहे असे नाही तर हि समस्या संपूर्ण जीवित प्राण्यांचा अस्तित्वाला धोकादायक झालेली आहे. आज कित्येक शहरात प्रदूषण आपल्या विक्रमी स्तरावर चढलेला आहे. प्रदूषणामुळे ओझोन चे स्तर खूपच कमी झालेले आहे. शास्त्रज्ञांचे असे मत आहे कि काही काळानंतर ओझोनची परत पूर्णपणे नाहीशी होईल आणि पृथ्वीवरील जीवन आपोआप संपुष्टात येईल.
प्रदूषणावर मात करण्यासाठी काही मूलभूत उपाययोजना करण्यात येऊ शकते जेणेकरून प्रदुषणाच्या राक्षसी समस्येवर थोडे का होईना किंबहुना काही प्रयत्न तर होईल. जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्नावर जोर दिले पाहिजे. जोराजोरात हॉर्न वाजविणे, गाणे वाजविणे इत्यादींवर टाळा बांधण्यात यावा. मृदेचे संरक्षण कसे करता येईल ह्याकडे नेमके प्रयत्न झाले पाहिजे. असे काही मूलभूत प्रयत्न अमलात आणल्यास प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर थोडे का होईना निदान मात तर करण्यात येईल.