English, asked by lahukatkar47926, 3 months ago

pradushan essay marathi​

Answers

Answered by Nayanmorkar5
1

Answer:

प्रदूषणाचे परिणाम सर्वांना ज्ञात आहेतच! त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज भासू लागली आहे. ही गंभीर समस्या जर विद्यार्थ्यांना शालेय जीवनात समजली तर भविष्यात ते विद्यार्थी एक सुजाण नागरिक बनून प्रदूषण कमी करण्याबद्दल उपाययोजना अंमलात आणतील.

हा निबंध लिहताना थोडेसे वास्तववादी स्वरूप स्पष्ट करायचे असते. प्रदूषणाचे परिणाम आणि त्याचे विश्लेषण योग्यरीतीने करून हा निबंध सुंदर बनवायचा असतो. अगदी सोप्या पद्धतीने हा निबंध कसा लिहू शकाल, ते आता पाहूया!

Explanation:

प्रदूषण हा शब्द म्हणजे पर्यावरणात निर्माण झालेले दूषण! प्रदूषण दोन प्रकारचे असते ज्यांचा संबंध आपल्याशी सरळसरळ येत असतो. एक म्हणजे जलप्रदूषण आणि दुसरे वायुप्रदूषण! आपण जमिनीवर राहत असल्याने हवा आणि पाणी यांचा सातत्याने वापर होत असतो आणि गरजही भासत असते. त्यामुळे हवा आणि पाणी स्वच्छ असणे आवश्यक आहे.

वायूप्रदूषण किंवा जलप्रदूषणाचा परिणाम एवढा भेडसावणारा ठरला नसता, परंतु वाढत जाणारी अनियंत्रित लोकसंख्या, त्यांच्या गरजा पूर्ण करता करता होणारी धावपळ आणि व्यर्थ विकासाच्या आणि अति तंत्रज्ञानाच्या मागे पळत राहिल्याने आपण निसर्ग आणि मुक्त वातावरण यांपासून खूप दूर होत चाललो आहोत याचा सारासार विचार झाला पाहिजे.

प्रथमतः हवेचे प्रदूषण पाहूया. आपण श्वास घेताना ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडत असतो. जर परिसरात पुरेशी वनराई असेल तर उत्सर्जित केले जाणारे वायू झाडे शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. याचा परिणाम म्हणून नैसर्गिकरित्या आपण निरोगी राहू शकतो. याउलट आज एवढी गर्दी एकत्र राहत असते की त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करतानाच निसर्गाची मोठी हानी होत असते. वाहने आणि उद्योग यामुळे हवा प्रदूषित होत असते.

आता एवढी लोकसंख्या गतिमान आणि प्रगत दाखवण्यासाठी गाड्या, उद्योग, नानाविध प्रकारचे कारखाने सुरू झाले. ज्यातून बाहेर सोडले अपायकारक वायू हे शरीरासाठी आणि पर्यावरणासाठी घातक ठरत आहेत. निसर्गात सहज उपलब्ध होणारे आरोग्य आज आपण दवाखान्यात शोधत आहोत. अनावश्यक वायू निसर्गात शोषले न गेल्यामुळे ओझोनचा थर कमी होऊ लागला आहे. मानव त्याचे परिणाम अनेक विकारांमार्फत भोगत आहे.

आता दुसरा मुद्दा म्हणजे जलप्रदूषण! दुसरा घटक जो शरीरात आवश्यक असतो तो म्हणजे पाणी! आपण पाणी पित असतो किंवा जे अन्न खातो त्यामध्ये पाण्याचा वापर असतोच. आज नदी, नाले, झरे असे नैसर्गिक स्त्रोतच दूषित होत चालले आहेत. त्याचे कारण म्हणजे शहरीकरण व औद्योगिकीकरण आणि त्यामधून अयोग्यरीतीने केले जाणारे कचरा व्यवस्थापन!

जमिनीवरील कचरा निर्मूलन करताना नदीच्या, पाण्याच्या स्त्रोतांजवळ सरळ सरळ कचरा टाकला जातो. त्यामुळे त्याचे विघटन पाण्यात होते आणि पाणी दूषित बनते. कारखान्यातून येणारे सांडपाणी, रसायने हीदेखील पाण्यात सहज सोडली जातात. याचा परिणाम सर्वांना आरोग्याची किंमत चुकवून भोगावा लागतो. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरजही वाढत आहे. स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात पण जे मोठे पाण्याचे स्त्रोत आहेत त्यांना कोणी स्वच्छ करत नाही. त्यांचे प्रदूषण सर्रास केले जाते.

प्रदूषणाचे वाढते दुष्परिणाम म्हणजे डोळ्यांचे, त्वचेचे, श्वसनाचे रोग, हृदयाचे रोग वाढत चालले आहेत. शरीर संपूर्णतः दूषित बनत चालले आहे. स्वार्थ आणि जागतिक सत्तेच्या विकासाखाली आपला देश तर स्वास्थ्याच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीवर आहे. अगोदर ज्यापद्धतीने आपण जगत होतो ती आरोग्यपूर्ण पद्धत संपूर्णतः सोडून देऊन पाश्चिमात्य जीवनशैलीकडे आपण गतिमान होत आहोत.

आजची विकासाची संकल्पना ही संपूर्ण मानवजातीचा विकास नाही तर फक्त भौतिक आणि नैसर्गिक संसाधने यांचा वापर वाढवणे यावर आधारित आहे. त्यामुळे प्रदूषण आणि अनारोग्य हे त्याचे दुष्परिणाम म्हणता येतील. भौतिक वस्तू आणि त्यांचा वापर वाढवण्याकरिता जनसंख्या वर्षानुवर्षे वाढणे गरजेचे आहे आणि तेच मुख्य प्रदूषणाचे कारण आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी निसर्गप्रेमी शिक्षण निर्माण होण्याची गरज भासू लागली आहे.

भुप्रदुषण हादेखील प्रदूषणाचाच प्रकार आहे. मातीची घटत चाललेली प्रत आणि मातीची होणारी धूप ही लक्षणे या प्रदूषणात येतात. जंगल तोड आणि रासायनिक पदार्थांचा वापर आणि विल्हेवाट या दोन कारणांमुळे भुप्रदुषणही आता तोंड वर काढत आहे. आपण जाणत असलेले उपाय हे तात्पुरते आहेत. अनावश्यक आणि पूर्ण न होणाऱ्या उपाययोजना अंमलात आणण्याचा व्यर्थ संकल्प न करता लोकसंख्या नियंत्रण आणि भौतिक विकासदेखील नियंत्रणात करण्याचा निश्चय केला पाहिजे म्हणजे निसर्गाशी एक सुसंगत व्यवहार निर्माण होईल आणि प्रदूषण कायमचे गायब होईल

Please give me a brainliest

Similar questions