Prasang lekhan on 'कलाम' यांचे भाषण ऐकण्याचा योग
Answers
Answer:
सोलापूर - भारताला महासत्ता बनवण्यासाठी संवादातून तरुणाईमध्ये स्वप्नांची प्रेरणा रुजवणारे माजी राष्ट्रपती, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाने विश्व पोरके झाले. शहरातील विविध क्षेत्रांतील शोकमग्न मंडळींनी वाहिलेली ही शब्दसुमने. युवकांचे प्रेरक हरपले
डॉ. वासुदेव रायते (पर्यावरणप्रेमी), विद्यार्थी-युवकांना प्रेरणा देणारा ‘मिसाइल मॅन’ हरपला आहे. देशाच्या प्रगतीसाठी सर्वांगीण प्रयत्न करणारा अन्् विकासाची दृष्टी देणारे ते व्यक्तिमत्त्व होते.
तासांतमिळाली प्रेरणा
किशोर ठाकरे (मुख्यउपवनसंरक्षक, ठाणे) : अत्यंत शांत व्यक्तिमत्त्वाचे डॉ. अब्दुल कलाम यांच्यासमवेत सोलापूरमध्ये स्मृती उद्यानातील अवकाश निरीक्षण केंद्राच्या उद््घाटन प्रसंगी राहण्याचे भाग्य मला मिळाले. त्या चार तासांच्या कालावधीत मला खूप मोठी प्रेरणा मिळाली.
नेहमीचऊर्जा मिळाली
रवींद्र सेनगावकर (पोलिसआयुक्त) विद्यार्थीप्रिय अन् अत्यंत शांत संयमी. चेहऱ्यावर नेहमी हास्य. डॉ. अब्दुल कलाम यांचे मौलिक विचार ऐकण्याची संधी मला पुणे येथील त्यांच्या अनेक कार्यक्रमांमधून मिळाली. त्यांच्या भाषणातून सकारात्मक ऊर्जा मिळे.
शास्त्रज्ञालामुकलो
दत्ता गायकवाड (ज्येष्ठसामाजिक कार्यकर्ते) : शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती अशा उच्च पदांवर काम करून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी उच्च मूल्यांची शिकवण दिली. मुस्लिम असूनही भारतीय संस्कृती, समाज जीवनाशी ते एकरूप होते. ही अभिमानाची गोष्ट. अशा थोर शास्त्रज्ञाला देश मुकला.