Proverbs in marathi where narmada comes here in subject list cannot get marathi but i need answer in marathi not hindi
Answers
Answer:
Proverbs म्हणजे "म्हणी" ,
Explanation:
खाली काही मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ दिले आहेत .
- आपलेच दात आणि आपलेच ओठ
कधीकधी प्रत्येकावरच अशी वेळ येते जेव्हा एखादा कठीण निर्णय घेण्याची वेळ येते. कारण ज्याच्यामुळे ती वेळ येते तो ही आपलाच असतो. त्यामुळे दोन्हीकडून नुकसान आपलंच असतं.
- आपलं ठेवायचं झाकून अन दुसऱ्याचं पहायचं वाकून.
ही म्हण आजच्या काळातही तंतोतंत लागू होते. फेसबुकचंच उदाहरण घ्या ना. ज्यावर इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे यात सगळ्यांनाच रस असतो. स्वतःच फेसबुक अकाउंटवर एक फोटो असेल पण इतरांचे सगळे फोटो पाहून झालेले असतात.
- आपला हात जग्गन्नाथ.
कधी कधी इतरांना एखादी गोष्ट करण्यास सांगितल्यावर वेळ वाया जातो आणि कामही होत नाही. त्यापेक्षा आपल्याच हाताने ते काम पटकन केलेलं बरं असं म्हणण्याची वेळ येते.
- आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट.
आजच्या काळात ही म्हण चपखल बसते. कारण आजकाल लोकांना स्वतःच्या मुलांचं कौडकौतुक करण्यातच जास्त धन्यता वाटते. पण इतरांच्या गुणी मुलांचं कौतुक करणारे विरळाच असतात.
- आलिया भोगासी असावे सादर.
आपल्यावर जो प्रसंग येईल त्याला तोंड द्यायला आपण तयार असलं पाहिजे.
- आला भेटीला धरला वेठीला.
एखाद्या प्रसंगी समोरच्याची चूक नसतानाही त्याला आहे समोर म्हणून नाहक भरीस पाडलं जातं.
- अति तेथे माती.
कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केल्यास त्याची किंमत राहत नाही.
- आंधळं दळतं कुत्रं पीठं खातं.
आजच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये म्हण अगदी लागू पडते. जिथे जो खरं काम करतो त्याला किंमत नसते आणि त्याच्या जीवावर भाव कोणीतरी भलताच खाऊन जातो.
- आधी पोटोबा मग विठोबा.
काहींना फक्त स्वतःचच पोट भरण्यात स्वारस्य असतं. मग याबाबतीत ते देवालाही सोडत नाहीत.
- आडात नाही तर पोऱ्ह्यात कूठून येणार.
आईवडिलांप्रमाणेच त्यांची मुलं असतात.
- आगीशिवाय धूर दिसत नाही.
कोणतीही घटना अशीच घडत नाही. त्यामागे नक्कीच काही ना काही कारण असतं.
- वड्याचं तेल वांग्यावर काढणे.
एखाद्याचा राग दुसऱ्यावर काढणे.
- बुडत्याला काठीचा आधार.
संकटकाळात कधी कधी छोटीशी मदतही मोलाची ठरते.
- अंथरूण पाहून पाय पसरावेत.
आपल्या उत्त्पन्नाप्रमाणे खर्च करावा असा या म्हणीचा साधा अर्थ आहे. कधीही खर्च करताना सर्वात आधी आपल्याला तेवढा खर्च करणं झेपेल का याचा विचार नक्की करावा.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी.
एखाद्या काम अडल्यावर मूर्ख लोकांच्याही पायी पडावं लागतं.
- अती शहाणा त्याचा बैल रिकामा.
एखाद्या बाबतीत अति शहाणपणा दाखवायला गेल्यास आपलंच नुकसान होतं. त्यामुळे कधीही एखादी गोष्ट नीट समजवून घ्यावी. त्याबद्दल इतरांचं मत घ्यावं आणि मग करावी. घाई करू नये.
- अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं.
थोड्याशा कौतुकानेही शेफारून जाणं.
- भिंतीला कान असतात.
कधीही कोणतीही महत्त्वाची गोष्ट करण्याआधी काळजी घ्यावी.