Hindi, asked by cheni1191, 1 year ago

purgrast nibandh in marathi

Answers

Answered by imraushanraaz
0

Explanation:

नमस्कार, मी प्रेरणा. एक पूरग्रस्त महीला. खरं तर कुठून सुरुवात करावी कळत नाहीये. मी अनुभवलेला महापूर म्हणजे एक भयाण वास्तविक अनुभव आहे. आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. घरी मी, माझे पती, दोन मुलं आणि सासू सासरे असे एकूण सहा जण. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात आनंदाने राहायचो. गावातचं आमचे किराणा दुकान, त्यावरच सगळा संसाराचा गाडा चालतो. पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पंचगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे हे एव्हाना कळाले होतेच पण ही नदी आमची देवता धोक्याची पातळी ओलांडून असं रौद्र रूप धारण करून आमचे अख्खे संसार एका क्षणात स्वतःच्या पोटात सामावून घेईल असं मुळीच वाटलं नव्हतं. पाहता पाहता आजुबाजूच्या गावात पाणी शिरायला सुरवात झाली, काहींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आम्ही सगळी परिस्थिती टिव्हीवर बघून घाबरलो होतो. नंतर लाइट नसल्याने काय चाललंय काही कळत नव्हतं. आमच्यावर कुठल्याही क्षणी ही परिस्थिती ओढाविणार हे माहित होते. रात्र रात्र झोप लागत नव्हती. कधीही आपल्याला इथून सुरक्षित ठिकाणी जावं लागेल म्हणून आम्ही सतर्क होतोच पण आतापर्यंत पै पै साठवून उभ्या केलेल्या ह्या घराचं काय? मोठ्या उत्साहाने घरात एक एक वस्तू घेतली, संसार सजविला पण आता जीवाची पर्वा करत घराचा विचार न करता सगळं सोडून कुठल्याही क्षणी जावं लागणार होतं. ही वेळ यायला फार काही उशीर लागला नाही. अचानक आमच्या गावातही पाणी शिरले, लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची धडपड सुरू झाली, बरेच बचाव कार्य करणाऱ्या तुकडीची पथके सुरक्षा जॅकेट, बोट घेऊन गावात पोहोचले. आमचं किराणा दुकान आधीच पाण्याखाली गेले होते. इतका सगळा किराणा माल आता कवडीमोल झाला होता, ज्यावर संसार अवलंबून तेच क्षणात वाहून गेले. आम्ही आहे त्या अवस्थेत सुरक्षा पथकाच्या मदतीने एका शाळेत पोहोचलो. घर असं नजरेपुढे पाण्याखाली जाताना बघून अंतर्बाह्य रडू फुटले होते पण त्या क्षणी घरातल्या प्रत्येकाचा जीव जास्त महत्वाचा होता. घरी परत कधी येणार याची शाश्वती नव्हती शिवाय परत आल्यावर घराची काय अवस्था झालेली असेल याचा विचारही करवत नव्हता.

Mark me as a brainlist thankyou

Similar questions