Hindi, asked by starmogh1512, 2 months ago

pustak ki aatmkatha in Marathi

Answers

Answered by sopenibandh
0

Answer:

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त... मराठी निबंध

आज आपण एका फाटक्या पुस्तकाची आत्मकथा बघणार आहोत.

नेहमीप्रमाणे शालेय दिवस होता. परंतु प्रत्येक शनिवारी आमचा लायब्ररीमध्ये जाण्याचा तास असतो. ज्या दिवशी लायब्ररीचा तास असतो त्या दिवशी आम्ही सगळी मुले एका रांगेने लायब्ररीत जातो आणि शिक्षक आम्हाला एक एक गोष्टीचे पुस्तकं पुढील एका आठवड्यासाठी वाचायला घरी न्यायला देतात.

दरवेळी मला उत्सुकता असते कीं मला कोणते पुस्तकं मिळेल? मला जादूच्या गोष्टीची पुस्तके वाचायला खूप आवडतात. मला जादूच्या गोष्टीचेच पुस्तकं हवे होते. परंतु मला बोधकथांचे पुस्तकं मिळाले त्यामुळे माझा थोडासा हिरमोड झाला.

मला मिळालेलं पुस्तकं मी तसाच दप्तरात टाकून घरी आलो. रात्री घरी जेव्हा गृहपाठ करून झाला तेव्हा माझी नजर मला मिळालेल्या गोष्टीच्या पुस्तकावर पडली. जुनाट, काळपट झालेलं ते पुस्तकं बघून मला त्याचा खूप राग आला आणि रागाच्या भरात मी ते पुन्हा दप्तरात भरायला गेलो तेवढयात माझ्या कानावर एक आवाज ऐकायला आले, ' अरे बाळ! नको रे माझा असा राग राग करुस! ' आणि मी पटकन दचकलो आणि त्या पुस्तकाकडे बघू लागलो.

तेवढ्यात ते पुस्तकं म्हणाले, 'होय! मी पुस्तक बोलतोय!'

Explanation:

वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया आमच्या ब्लॉगला भेट दया.

Similar questions