India Languages, asked by bhupigohil4990, 7 months ago

Pustak ki atmakatha in marathi

Answers

Answered by Anonymous
7

Answer:

मधु लिमये यांच्या आत्मचरित्राचा हा पहिला खंड. या आठवणींचे लेखन त्यांनी आणीबाणीतील स्थानबद्धतेच्या काळात सुरू केले. स्वातंत्र्यपूर्व आंदोलनाचा सोनेरी कालखंड या आठवणीतून व्यक्त होतो. एक राजकीय नेता आणि विचारवंत म्हणून मधु लिमये यांची जडणघडण याच झाली. २४ डिसेंबर १९९४ रोजी हा खंड लिहून पूर्ण झाला आणि८ जानेवारी १९९५ रोजी अल्पशा आजाराने मधुलिमये यांचं निधन झालं.

----------------

'आत्मकथा' ही एक 'राजकीय आत्मकथा' आहे आणि १९३७ ते १९४७ या कालातील व्यापक अश्या जनआंदोलनात लिमयांच्या व त्या वेळच्या अन्य देशभक्तांच्या वैयक्तिक जीवनाचे रंग कसे मिसळून गेले आहेत याची यथार्थ कल्पना आपल्याला आत्मकथेवरून येते. सध्याच्या 'झटपट पुढारी' जमान्यात तर या पुस्तकाचे महत्व अधिकच जाणवते. प्रत्यक्ष जीवनात जेव्हा अनेक कारणांनी प्रचंड खळबळी माजतात; त्या वेळी श्रेष्ठ साहित्यात त्याचे प्रतिबिंब उमटत असते आणि अशा साहित्यातूनच नव्या पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते. फक्त स्वत: आणि स्वत:चे आप्तस्वकीय यांचे 'चांगभले' करण्यामागे असलेल्या आजच्या तथाकथित नेत्यांच्या तुलनेत; पराकोटीचा त्याग, संघर्ष आणि कष्ट सोसणार्‍या या मागच्या पिढीतल्या कार्यकर्त्यांचे 'आत्मकथे'तील सत्यदर्शन आजच्या तरूणांना काही वेगळे भान देईल असा विश्वास वाटतो.

---- उषा मेहता (ललित, २/१९९७)

Similar questions