India Languages, asked by Amaira4917, 11 months ago

Pustakache mahatva in marathi essay

Answers

Answered by nisi14282
65

Answer:

      आपल्या अवतीभोवतीचे अदृश्य जग जाणायचे असेल तर नक्कीच सर्वांनी वाचनाची कास धरावी.कुणावर प्रेम करायचे असेल तर ते पुस्तकावर करायला हवे.पुस्तकांशी एकदा घट्ट नाते जुळलं की जीवनाचा प्रवास अगदी आरामदायक होतो.कारण तुमची काळजी घ्यायला आता पुस्तक सदैव तुमच्या सोबतीला असतं. जर तुम्ही पुस्तकांच्या प्रेमात पडाल तर सहजच तुम्हाला वाचनाची आवड लागेल.एकदा ही आवड आपणास लागली तर बघा आपल्या जीवनात काय फरक पडतो ते.मनातील जळमटं काढून टाकण्याचा एकमेव उपाय म्हणजे विविधरंगी वाचन.मेंदूसाठी सर्वोत्तम खाद्य म्हणजे वाचन होय.

                    माणसाने छंद जपावा तो वाचनाचा.त्यातही वाचन ही एक कला आहे जी सरावातून साध्य होते.दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणाला आपण जे अनुभवतो त्याचा संबंध आपले वाचन जर अथांग आणि समृद्ध असेल तर त्याच्याशी जुळलेला असतोच. माणसाला इतर व्यसनांपेक्षा वाचनाचं खुप व्यसन असावं. कठीण समयी आपल्याला वाचनाचेच संदर्भ आपल्याला उपयोगी पडतात.एखाद्या चर्चेत भाग घ्यायचा असेल तर आपले समृद्ध वाचनच आपली मदत करते.सृजनात्मक चर्चेसाठी विविधांगी वाचनाची जोड ही नक्कीचअसावयास हवी.

     पुस्तक हा आपला गुरू असतो हे मानायला हरकत नाही कारण आपण ज्या गोष्टीचे वाचन केले आहे त्या वाचनातून आपण बरंच काही शिकतो व घडतो. शिकवण्याचं, मार्ग दाखवण्याचं, घडवण्याचं काम हे पुस्तक करतंच ना! मग पुस्तक म्हणजे आपला गुरूच आहे. पुस्तक हा आपला मार्गदर्शक असतो. बऱ्याच वेळी चुकलेला रस्ता सोडून सरळ मार्गाने चालण्यास भाग पाडण्याचे काम ते पुस्तकालाच जमतं.

     विद्यार्थी जीवनात हलकं फुलक वाचन करून आपण सुरुवात करू शकतो.कथा कादंबऱ्या किंवा नाटके इथून आपणास सुरुवात करता येईल.त्यानंतर हळूहळू दर्जेदार लेख,संपादकीय विविध वृत्तपत्रे असा हा आलेख वाढवत न्यावा.चरित्र वाचन हे सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे एखाद्या महान व्यक्तीचे जीवन कसे घडत गेले हे आपणास कळते.त्याचे संदर्भ आपणास प्रत्येक ठिकाणी उपयुक्त पडू शकतात.शाळेत विद्यार्थ्यांना एखादा पाठ जर आपण 4 ते 5 वेळा वाचण्यास सांगितला तर आपले अर्धे अधिक काम आधीच झालेले असते.असा माझा अनुभव आहे.त्यामुळे विद्यार्थी दशेतच हेतुपुरस्सर योग्य वाचन संस्कार देणे हे शिक्षकांचे ध्येय असले पाहिजे,तरच वाचन संस्कृती रुजेल व वाढेल.

         आपण वाचलेलं कधी थोडा वेळ स्मरणात राहतं, तर काही पुस्तके आयुष्यभर स्मरणात राहतात.असं का होत असावं?आजूबाजूची परिस्थिती आपल्या वाचनावर नक्कीच परिणाम करते.यावर सोपा उपाय म्हणजे एखाद्या पात्राचा अभ्यास करताना त्या पात्रात स्वतःला बघावे अथवा एखादी कहाणी वाचताना आपणच त्या कहाणीचा एक भाग आहोत अशी कल्पना करावी.कधीकधी एखादं पात्र आपल्या मनावर गारुड करतं उदाहरण द्यायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज.महाराजांचा इतका किचकट इतिहास आपण सहज आपल्या भाषेत सांगू शकतो.किंवा मृत्युंजय मधला कर्ण असो व माझा लढा मधला हिटलर असो असे अनेक पात्र असतात जी आपल्याला वाचनाची ओढ लावतात.यात आपल्या वाचन प्रेमापेक्षा ती पात्रेच आपल्याला त्यांच्याकडे ओढत असतात.अर्थातच याचे श्रेय ही पात्र रेखाटणाऱ्या लेखकाला पण नक्कीच द्यावे लागेल.

           शिक्षक असल्यामुळे निरीक्षण करणे ही माझी सवय. लहान मुलांच्या भाव भावनांचे निरीक्षण करणे हा माझा आवडता  विषय.त्यावरून आपल्याला योग्य ते निष्कर्ष काढता येतात.पण आजकाल बहुतेक मंडळी मोबाईल,हेडफोन व लॅपटॉप मधेच गुंग असतात.हे करत असताना त्यांना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे पण भान नसते.तो प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा भाग असू शकतो.हा भाग वेगळा पण हीच एकाग्रता आपण वाचनात दाखविली तर ?? याचा फायदा आपणास नक्कीच होऊ शकतो.वेळ मिळेल तसे आणि मिळेल तेव्हा आपण वाचन करावयास हवे या मताचा मी आहे. 

      वाचनाचे बरेच फायदे आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. आपले वाचन समृद्ध असेल तर  समाजात वावरताना, किंवा आपल्या व्यवसायात व्यक्तीशी संवाद साधताना आपण कधीच अडखळत नाही.कोणता शब्द कुठे आणि जसा वापराचा याचे ज्ञान आपणास अवगत झालेले असते त्यामुळे संवाद सुकर होतो. थोडक्यात वाचनामूळे आपले शब्द भंडार समृद्ध होते.लिखाण करतानासुद्धा आपल्याला व्याकरणात चुका टाळता येतात.सोबतच संभाषण कौशल्य विकसित झाल्यामुळे बोलताना इतरांची मने दुखविणे टाळता येते.अगदी एकटे असण्यापेक्षा सोबतीला पुस्तके असलीत तर कधीही चांगले

Answered by affanakmar08
2

ऊपर का उत्तर सही है वो लिखिए

Explanation:

धन्यवाद

Similar questions