Pustakcha mahatva in marathi
Answers
Answer:
मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे आणि हा समाजात राहतो. त्यामुळे त्याला समाजात राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. मानवाला सर्व प्रकारचे ज्ञान हे पुस्तकातून मिळते.
पुस्तके ही प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची असतात. कारण पुस्तके ही ज्ञानाचा समुद्र आहेत जी आपल्याला ज्ञान देतात. पुस्तके ही एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य निर्माण करायला मदत करतात. म्हणून पुस्तकांना मानवाचे खरे मित्र देखील म्हटले जाते.
कारण पुस्तके ही नेहमीच माणसाला योग्य मार्गदर्शन करतात आणि योग्य दिशा दाखवतात. पुस्तके वाचल्याने केवळ एखाद्या व्यक्तीचे ज्ञान वाढत नाही तर एक मनोरंजनाचे साधन देखील आहेत.
पूर्वीच्या काळी कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवायचे असेल तर गुरूकडून ज्ञान प्राप्त केले जात असे. परंतु आता सर्व गोष्टीचे ज्ञान हे पुस्तकांमधून प्राप्त होते. त्यामुळे माणसाचा सामाजिक आणि मानसिक विकास होतो.