World Languages, asked by pardnyadear79, 9 months ago

pz marathi sub tell anyone answer​

Attachments:

Answers

Answered by rishikadeshpande06
1

Answer:

नदी पर्यावरणाचा एक महत्वाचा हिस्सा व अंग आहे. नदी ही आमची जीवनदायिनी आहे. नदी कितीतरी सजीवांना आपल्या पाण्याने जीवनदान देते. तहानलेला प्राणी व पक्षी नदीचे पाणी पिऊन आपली तहान भागवतो.

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर विद्यार्थ्यांना नदीची आत्मकथा या विषयावर निबंध लिहायला दिला जातो. नदीची आत्मकथा हा नेहमी विचारला जाणारा विषय आहे. जर आपण अशी कल्पना केली जर हि नदी बोलू लागली तर काय बोलेल.

जेव्हा आम्ही घरातील सर्वजण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उत्तर भारतात फिरण्यासाठी गेलो. तेव्हा ताजमहाल, ऋषिकेश अशा पर्यटन स्थळी फिरून आम्ही गंगोत्री म्हणजे गंगा नदीच्या पत्रावर गेलो. तिच्या काठावर मी भटकत होते आणि माझे मन स्थिर होत नव्हते.

माझ्या मनाला धकधक लागून राहिली होती. मी तिथे एकटी फिरत असताना माझ्या कानी हाक ऐकू आली. मी इकडे – तिकडे पाहिले. पण मला तिथे कोणीच दिसेना. मला वाटल भास झाला म्हणून मी पुढे सरसावले. परंतु आणखी एकदा मला हाक ऐकू आली.

तेव्हा नदी म्हणाली, आग घाबरतेस कशाला ? मला ओळखले नाहीस का तू ? तू किती वेळा माझ्या पाण्यामध्ये खेळून आनंद लुटलास तीच मी या आपल्या मातृभूमीची माता, गंगा नदी. माझी ओळख विसरलीस का तू. मी तुला आज माझी कहाणी सांगते. मग तू विचार कर आणि तुझा मूल्यवान वेळ माझ्या सोबत व्यतीत कर. माझे सुख – दुख समजून घे.

मी एक नदी आहे आणि माझा जन्म हिमालयाच्या उंच शिखरावर आणि पर्वतमालांच्या कुशीत झाला आहे. मी लहानपणापासूनच फार अवखळ होते. तसेच मी एका जागेवर न थांबता सतत वाहत असते.

मी जेव्हा वाहत असते तेव्हा माझ्या समोर अनेक संकट येतात. तरीपण मी आपल्या जीवनामध्ये रस्ता काढून सतत धावत राहते. वाटेतील झाडे – झुडपे, तसेच वेली माझा वात अडविण्याचा प्रयत्न करतात. तर कधी – कधी माझ्याशी लपंडाव सुद्धा खेळतात.

मला नेहमी अनेक भाऊ – बहिणी येऊन मिळायचे. त्यामुळे मी जास्त वेगाने वाढत असे. जसे मी कळसापासून पायथ्यापर्यंत वाहत जाते असे तेव्हा मला अन्य संकटाना सामोरे जावे लागत असे. मी सर्व संकटाना तोंड देऊन आपले ध्येय गाठत असते.

मी एखाद्या शूरवीर योद्ध्या प्रमाणे लढत असते आणि माझ्या जीवनात पुढे जात असते. या सगळ्या संकटांमध्ये माझ्या बहिण – भावंडानी माझी शेवट पर्यंत साथ दिली.

I hope this helps you

Similar questions