Q8. दिलेल्या मुद्यांवरून कथा लिहा. कथेला शीर्षक आणि तात्पर्य द्या.
कोल्हा द्राक्षाच्या वेलीखालून जात असतो - तोंडाला पाणी सुटते - खूप उड्या मारतो-द्राक्षे मिळत नाहीत - मनात दुःखी होतो - पण स्वत:ला समजावतो की, ही दाक्षे आंबट आहेत
Answers
Answer:
¤ कोल्हा आणि द्राक्षे ¤
एक भुकेलेला कोल्हा फिरत फिरत एका द्राक्षाच्या मांडवाखाली आला. वर पाहतो तो सुंदर पिकलेले द्राक्षाचे घड लोंबत आहेत; परंतु मांडव उंच असल्यामुळे ते त्याच्या हाती लागेनात. त्याने पुष्कळ उडया मारल्या, परंतु एकही द्राक्ष त्यास मिळाले नाही. मग अंमळ दूर जाऊन द्रक्षांकडे पाहून तो म्हणतो, ‘ही द्राक्षे जो कोणी घेईल ते घेवो, मी तर ही हिरवी व आंबट म्हणून सोडून देतो.
तात्पर्य:- कित्येक लोक असे असतात की, त्याच्या हाती एखादी चांगली वस्तू लागली नाही म्हणजे तिला ते काही तरी खोड ठेवून आपला हलकेपणा लपविण्याचा प्रयत्न करतात.
Answer:
एका जंगलात एक कोल्हा राहत होता. एके दिवशी, सकाळी त्या कोल्हाला भूक लागते. तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते.
शेवटी त्याला एक द्राक्षांचा मळा दिसला आणि तो द्राक्षांच्या मळ्यात गेला. तिथे सगळीकडे द्राक्षेच द्राक्षे असतात. सगळीकडे द्राक्षांचे घडच घड लटकलेले दिसतात. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो विचार करतो, ही फळे चवदार दिसत आहेत. मला ती पाहिजेत.
कोल्हा तिथे थोडा वेळ बसतो आणि द्राक्षांचे वेल आणि द्राक्षे नीट पाहत असतो. द्राक्षे खूप उंचावर असतात. त्याच्या पोहचण्यापलीकडे उंच लटकत होती. त्यामुळे तो उडी मारून पिकलेले द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न करू लागतो.
परंतु तो द्राक्षापर्यंत पोहचू शकत नाही. तो पुन्हा पुन्हा उंचच उंच उड्या मारतो पण द्राक्षे नेहमी त्याच्या उंचीपासून लांबच लांब असतात. काही वेळाने तो उड्या मारून मारून दमून गेला. त्यानंतर तो स्वतःशीच पुटपुटला, कोणाला खायला हवी ही आंबट द्राक्षे ? मला तर नकोतच..! असे म्हणून तो तेथून निघून जातो. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा तिरस्कार कारण खूप सोप्पं असतं.
तात्पर्य- अंथरून पाहून पाय पसरावे.
Explanation:
please mark me as a brainliest!!!
Have a good day!!