☝️que in attachment so plz answer it plz
Answers
उत्तर :
★ प्रश्न :
अमित / अनिता इंगळे, पंचवटी, नाशिक येथून आपल्या परिसरात होत असलेल्या बागेच्या दुरवस्थेबाबत आयुक्त महानगरपालिका, नाशिक यांना तक्रार पत्र लिहितो / लिहिते.
Explanation:
प्रभाग क्रमांक - 27
पंचवटी,
नाशिक - 422003.
दिनांक - 13/03/2021
प्रति,
मा.आयुक्त,
नाशिक महानगरपालिका,
नाशिक - 422003.
विषय :- परिसरातील होत असलेल्या बागेच्या दुरवस्थे बद्दल तक्रार करणे बाबत.
माननीय महोदय / महोदया,
मी, श्री अमित इंगळे, पंचवटी, नाशिक येथे राहतो. वॉर्ड (प्रभाग) क्रमांक 27 इथे वास्तव्य करणारा रहिवासी म्हणून मी पत्र लिहीत आहे, या प्रभागांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच वयोवृद्ध नागरिकांना सकाळ व सायंकाळ मोकळ्या हवेत फिरण्यासाठी शासनामार्फत एक बगीच्या उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु महोदय या बगीचे ची अवस्था अत्यंत दयनीय होत चाललेली आहे. हे या पत्रा मार्फत मला सूचित करावयाचे आहे.
आजुबाजू तील नागरिक या बगीच्या मध्ये कचरा टाकत आहेत त्या कचऱ्यामुळे अनेक मोक्कार फिरणारी जनावरे,कुत्री तेथे वास्तव्य करतात. जागोजागी पाणी साचल्यामुळे डासांचा उपद्व्याप वाढलेला दिसून येत आहे.
जागोजागी गवत वाढलेले आहे त्याची निगा राखण्यासाठी प्रशिक्षित माळी उपलब्ध करून द्यावा.
लहान मुलांना खेळण्यासाठी दिलेली साधने जसे - घसरगुंडी, झोका तुटलेली दिसून येतात, बगीच्या मधील बसण्यासाठी ठेवलेले बाक मोडकळीस आलेले आहेत .
काही लोक मद्यपान करून त्या बगीच्यामध्ये जुगार खेळताना आढळून आली त्यामुळे लहान मुलांना याठिकाणी खेळता येत नाही.
आमच्या प्रभागांमध्ये हा एकच बगीचा आहे जेथे लहान मुलांना खेळतात आणि वयोवृद्ध नागरिकांना मोकळ्या हवेत फिरायला जागा मिळते.
तरी, मी आपणास विनंती करतो,या गंभीर विषयाची दखल घेऊन आपण जातीने लक्ष घालावे.
धन्यवाद,
अमित इंगळे