Que - ( In Marathi language )
• मानवी जीवनात पुस्तकांचे महत्व स्पष्ट करा.
- no spams❌
- no copied answers ❌
Answers
पुस्तके ही प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची असतात. कारण पुस्तके ही ज्ञानाचा समुद्र आहेत जी आपल्याला ज्ञान देतात. पुस्तके ही एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य निर्माण करायला मदत करतात. म्हणून पुस्तकांना मानवाचे खरे मित्र देखील म्हटले जाते.
कारण पुस्तके ही नेहमीच माणसाला योग्य मार्गदर्शन करतात आणि योग्य दिशा दाखवतात. पुस्तके वाचल्याने केवळ एखाद्या व्यक्तीचे ज्ञान वाढत नाही तर एक मनोरंजनाचे साधन देखील आहेत.
पूर्वीच्या काळी कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवायचे असेल तर गुरूकडून ज्ञान प्राप्त केले जात असे. परंतु आता सर्व गोष्टीचे ज्ञान हे पुस्तकांमधून प्राप्त होते. त्यामुळे माणसाचा सामाजिक आणि मानसिक विकास होतो.
पुस्तके ही प्रेरणेचे भांडार आहेत. कारण ती वाचून आपल्याला जीवनात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. आपले विचार आणि भावना दुसऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुस्तके होय.
प्राचीन काळात पुस्तके छापण्याची सुविधा नसल्यामुळे सर्व पुस्तके ही हस्तलिखित असायची. तसेच पुस्तके ही सहज मिळू शकत नव्हती. कारण त्यावेळी पुस्तकांचे मुद्रण करायला विविध साधने उपलब्ध नव्हती.
त्या काळी लेखक कोणतेही ज्ञान हे पेनाच्या साहाय्याने कागदावर लिहायचे. प्राचीन काळी तांबे आणि भोजपत्र यांचा वापर केला जात असे. त्यावेळी पुस्तके ही कमी प्रमाणात लिहिली जात असत. ज्ञानाची देवाण – घेवाण ही मुख्यतः बोलण्यातून आणि लक्षात ठेवण्याद्वारे होत असे.
आजच्या काळात अनेक लेखकांची पुस्तके ही प्रत्येक विषयावर उपलब्ध आहेत. या पुस्तकांमध्ये भाषेचे बंधन नसते. त्यामुळे सध्याची पुस्तके ही हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू अशा अनेक भाषांमध्ये विकसित आहेत.
परंतु आजच्या आधुनिक काळात छापखाने विकसित झाल्यामुळे अन्य प्रकारच्या पुस्तकांची निर्मिती होऊ लागली. तसेच विविध पुस्तके ही सहजपणे उपलब्ध होऊ लागली. आता प्रत्येक विषयाची माहिती मिळविण्यासाठी विविध भाषेतील पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
कोणत्याही प्रकारचे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हटले जाते. पुस्तक हे लेखकाची कल्पनाशक्ती, भावना आणि ज्ञान प्रतिबिबित करते. पुस्तकाच्या माध्यमातून लेखक ज्ञानाचा प्रकाश पसरवतात.
पुस्तक लिहिणारे लेखक सुद्धा हे जग सोडून जातात. पण पुस्तक मात्र कायम तसच राहत. पुस्तक हे कोणत्याही लेखकाचे कार्य आणि नाव उज्ज्वल करत.
पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो. तसेच पुस्तकाद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे. जी कधीच थांबत नाही.
परंतु अशी काही पुस्तके आहेत जी आपल्याला चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करतात. म्हणून आपण अशी पुस्तके वाचणे टाळावे आणि नेहमी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक पुस्तके वाचली पाहिजेत.
जर आपल्याजवळ पैसे नसतील तर जवळच्या ग्रंथालयात जाऊन अभ्यास करू शकतो. सरकारी शाळेत सुद्धा पुस्तके ही विनामूल्य उपलब्ध आहेत. ज्ञान प्राप्त करणे हा एक चांगला आणि सोपाव स्वस्त मार्ग आहे.
पुस्तकांमुळे प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो. तसेच पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो.
पुस्तके ही आपली चांगली मित्र आहेत. म्हणून आपण सर्वानी नेहमी चांगले ज्ञान देणारी पुस्तके वाचली पाहिजेत.