Question:10
इ.स. १९६१ मध्ये कुणाच्या गुलामगिरीतून
गोवा हा प्रदेश मुक्त करण्यात आला?
Answers
Answer:
..................................................
Answer:
पोर्तुगीज सत्ता
Explanation:
भारतातीलसोळाव्या शतकात व्यापारासाठी अनेक यूरोपीय हिंदुस्थानात आले. त्यांपैकी पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दमण, दीव या प्रदेशांवर १९६१ अखेर अधिसत्ता गाजवली. नौदलात पुढारलेले पोर्तुगीज पंधराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून व्यापारासाठी भारतात आले. दुसऱ्या दों जुआंव राजाचा साहसी प्रतिनिधी पेद्रू द कूव्हील्यांउं हा भारतात येणारा पहिला पोर्तुगीज. १४८८ मध्ये तो अरब व्यापारीवेषात कननोर येथे पोहोचला. १४९१ मध्ये त्याने गोवा, कालिकत व मलबार किनाऱ्यावर मिळालेली माहिती गुप्तपणे पोर्तुगाल राजाच्या कैरो येथील प्रतिनिधीला पाठविली. यानंतर वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून १४९८ मध्ये कालिकत जवळच्या एका खेड्यात उतरला. त्याने सामुरी राजापासून कालिकत येथे वखार घालण्याची परवानगी मागितली. यानंतर दोन वर्षांनी पेद्रो आल्व्हरीश काब्राल भारतात आला (१५००)