Question 4:सनातनवादी दृष्टिकोन विचारांचा काळ कोणता? १८६० ते १९३० १८७० ते १९२० १८८० ते १९१० यापैकी नाही
Answers
Answer:
अर्थशास्त्र : मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र अर्थशास्त्र हे होय. अर्थशास्त्राच्या विकासाच्या प्रारंभीच्या काळात लोकांचे उपजीविकेचे दैनंदिन व्यवहार कसे चालतात, राष्ट्राची संपत्ती कशी वाढविता येईल, यांसारख्या प्रश्नांचे विवेचन करणे हे अर्थशास्त्राचे कार्य आहे, असे ढोबळपणे समजले जात असे. या सर्व प्रश्नांच्या मागे असणारी मूलभूत समस्या स्पष्ट करण्याचे श्रेय प्रा.रॉबिन्स यांचे आहे. ‘मानवाच्या अमर्याद गरजा व त्या भागविण्यासाठी उपलब्ध असलेली (पर्यायी उपयोगाची शक्यता असलेली) मर्यादित साधनसामग्री, यांचा मेळ घालण्याच्या उद्देशाने होणाऱ्या मानवी व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय’, ह्या प्रा. रॉबिन्स यांनी केलेल्या व्याख्येमुळे अर्थशास्त्रविषयक विचारांत अधिक सूक्ष्मता आली