World Languages, asked by Parva171, 1 year ago

रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेचे रसग्रहण

Answers

Answered by anildeshmukh
24

महानोरांचे रानातल्या कविता, वही, पावसाळी कविता, प्रार्थना दयाघना

पळसखेडची गाणी हे काव्यसंग्रह लोकप्रीय झाले आहेत.

महानोरांची कविता जीवंत, सळसळणारी, व चैतन्यानी भारलेली आहे. ही कविता आहे निसर्गाची, शेताभाताची, आकाश धरतीची कविता आहे.

कवितेला ऊपजत अशी लय आहे.त्यामुळे कोणी वेगळी चाल न लावताही ती वाचकाला गुणगूणता येते.

ही कविता निसर्गातील परस्पर तादात्म्याची आहे तशीच तिला एक सामाजिक परिमाण आहे.

कविता केवळ ३ कडव्यांची आहे . पण खूपच आशयघन आहे . भारतीयअर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आणि त्याच्या खळ्यात येणार पीक हे कवीला मोलाच वाटतं आणि म्हणून पहिल्या कडव्यात कवी निसर्गाला आणि जगदनियंत्याला विनवतात की ,'ह नभानो हे जलदांनो तुम्ही महान दाते आहात. या धरित्रीला या मातीला जलबिंदूंच असं दान द्या की अवघी माती कोंबांकोंबातून गीत गाईल,चैतन्याने डुलू लागेल. कविला मनोमन प्रश्न पडतो की असं कोणाचं कोणतं पुण्य फळाला येतं की जोंधळ्याची कणस चांदण्यासारख्या तुकतूकीत दाण्यांनी खळ्यात लुकलूकु लागतात? त्याचा त्यांना आनंदमिश्रीत विस्मयही वाटतो.

दुसर्‍या कडव्यात ते कृतज्ञतेच्या भावनेनी

भारावून म्हणतात , 'या नभाच्या दानामुळे आणि नंतर येणार्‍या सुफळ अशा पीकपाण्यामुळे माझ्या डोळ्याच्या पापण्या आनंदाश्रृंनी ओथंबतात. ऋतुचक्र पालू राहत. नववर्षा ते पेरणी ते कापणी या पीकं तयार होण्याच्या ९ महान्यांच्या ऋतुचक्रात अवघ्या निसर्गावर, सृष्टीवर सृजनाची नवकांती पसरली आहे.दाणे भरलेल्या कणसांवर फिरून फिरून पाखर झेपावतायत आणि त्यांच्या त्या खेळात मी जणू त्यांच्याबरोबरोबर खेळगडी होऊन डाव मांडतोय. किती सजीव असं चित्रण आसे र्निसर्गाचं ! आणि कवीचं मनही कसं निर्व्याज आहे!

कवी महानोर हे हाडाचे शेतकरी आहेत. ते कायम खेड्यात शेतातल्या घरावर राहतात . झाडं पानं फुलं नद्या शेतं प्राणी यावर त्यांच नितांत प्रेम आहे. बळिराजा ,त्याचं स्वप्न, त्याच्या इच्छा आकांक्षा याची खोलवर जाण त्यांना आहे.

म्हणूनच ते लिहतात,

'गुंतलेले प्राण ह्या रानात माझे

फाटकी ही झोपडी काळीज माझे,

झरता पाऊस ,वाहते ओहोळ, नवांकुर आणि डोलतं पिक , सुर्याची सोनकिरणं हे सारं पाहून ते आनंदानी बेहोश होतात आणि न कळत त्यच्या भावना कवितेतून आकाराला येतात . कवितेला साद घालताना ते शेवटच्या ओळीत लिहतात ,"शब्दगंधे ' तू मला बाहूत घ्यावे!"

कवितेत यमक साधताना कवीला शब्दांशी झगडावं लागलं नाहीये. ऊलट रेशमी लड अलगद ऊलगडत जावी तशी शब्दांची फुलपाखरं कवितेतल्या ओळींच्या फांदी फांदीवर लिलया बसतात.त्यांच्या कवातेतील शब्दाशब्दाला नभाचा, मातीचा , वार्‍याचा थेंबाचा, दरवळणार्‍या कणसांचा , गंध आहे.ऋतुंचा रंग आणि गंध आहे!

म्हणुनच त्यांची ही आणि अशा अनेक शब्दगंधी ऋतूरंगी कविता मला फार भावतात.ओठावर रूणझुणतात,

Answered by 00741
0

Answer:

hope this helps

explanation in English

Attachments:
Similar questions