रंग नसते तर निबंध in marathi
Answers
Answer:
ज्या ठिकाणी रंगांचे अस्तित्व आहे त्या ठिकाणी सौदर्य असते. कवी-लेखक हे सौंदर्याचे पुजारी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून किंवा काव्यातून रंगांचे देव्हारेच रचतात. चित्रकार तर रंगांच्या दुनियेतच वावरत असतात. रंग नसते, तर सौंदर्याची दुनियाच नसती! रंगाची उधळण करणारे होळी, रंगपंचमी, दिवाळी, नवरात्र हे सणही नसते. कॉलेजमध्ये रंगांचा उत्सव मांडणारे साडी डे, रोझ-डे, यांसारखे उत्सवच नसते. रंगांच्या निर्मितीत गुंतलेले लाखो-कोट्यावधी लोक उपाशी राहिले असते.
रंग नसते तर सगळे जग एकतर पांढरे असते किंवा काळे असते. कल्पना करा, तुम्ही जेवायला बसला आहात. काळ्या ताटात काळा भात, त्यावर काळे वरण, काळी चटणी, लोणचे, कोशिंबीर, पापड, मीठ हे सर्व काळेच. शेजारीच काळ्या रंगाच्या तांब्यात काळे पाणी! आपली शाळा काळीच असेल. वर्ग,वर्गातील बाके, फळा, खडू काळेच. मग काळ्या खडूने काळ्या फळ्यावर लिहिल्यावर काय दिसेल ?
त्यामुळे रंग आपल्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण असतात.
Explanation:
Please mark me as brainliest.