रोगप्रतिकारक शक्ती व आरोग्यदायी सवयी निबंध in marathi
Answers
Answer:
आपण सर्वजण करोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्या आहार पद्धतीवर व आरोग्यावर लक्ष केंद्रित करुन अधिकची सर्व काळजी घेत आहोत. पण करोनापासून बचाव करण्यासाठी फक्त चांगल्या सवयी किंवा गोष्टी आत्मसात करुनच चालणार नाही तर त्यासाठी आपल्यातील काही वाईट सवयी देखील सोडाव्या लागतील. पण या सवयी आपल्यातील ब-याच लोकांमध्ये आहेत आणि याची आपल्याला जाणीवही नाही. त्यामुळे जाणून घ्या या वाईट सवयींबाबत सर्व माहिती.प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आहारशैलीनुसार काही सवयी असतात. यातही दोन प्रकार असतात. काही लोकांच्या सवयी चांगल्या असतात ज्या त्यांना निरोगी राहण्यास मदत करतात. पण काही लोकांच्या सवयी या वाईट असतात ज्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतात. यापैकी काही सवयी अशा असतात ज्या तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करू शकतात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती या सवयींमुळे कमी होऊ शकते. तुम्हाला तर माहित आहेच की या करोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती किती महत्त्वाची आहे.
त्यामुळे या सवयी तुम्ही शक्य तितक्या लवकर बदलून निरोगी सवयींना जवळ केले पाहिजे. आज आपण या लेखातून अशाच सवयी जाणून घेऊया आणि सोबत याची सुद्धा माहिती घेऊया की या वाईट सवयी कशाप्रकारे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात.
पाणी गटागटा आणि उभे राहून पिणे
आपल्याला सगळं काही पटापट करायची सवय असते आणि या सवयीचा एक भाग म्हणजे आपण पाणी सुद्धा उभं राहूनच पितो. आता तर लोकं ग्लासात सुद्धा पाणी घेऊन पीत नाहीत. थेट बॉटल उघडतात आणि एका श्वासात गटागटा पाणी पितात. हे जरी कुल वगैरे वाटत असलं तरी तुम्हाला एक गोष्ट माहित हवी की अशा प्रकारे पाणी पिणे हे फुफ्फुसे आणि किडनीसाठी धोकादायक आहे. या चुकीच्या प्रकारे पाणी प्यायल्यानेच आपल्याला वारंवार तहान लागते. गळा सुकतो. खूप युरीन बाहेर पडते. वारंवार थकवा जाणवतो. म्हणून तुम्ही हि सवय बदलून शक्यतो बसूनच पाणी प्यावे. जेणेकरून त्या पाण्याचा शरीर योग्य प्रकारे वापर करू शकेल. आपले टेस्ट बड्स शांत होतील आणि रोगप्रतिकारक शक्ती कायम राहील.