Political Science, asked by aniljadhav7104, 1 month ago

राज्यकारभारात प्रत्यक्ष जनतेचा सहभाग असने काय म्हनतात?​

Answers

Answered by pintusen0676
2

Answer:

आपल्या मागण्याच्या प्रचारासाठी भाषणे, मोर्चा इत्यादी मार्गांचाही अवलंब करतात. असे समान हितसंबंधी लोकांचे गट प्रशासकीय निर्णयप्रक्रियेवर दबाव आणण्याचे कार्य करतात. प्रभावी आणि परिणामकारक जनमत हे देखील लोकांच्या सहभागाचे निदर्शक असते. प्रसारमाध्यमांचा वापर करून जनता वेळोवेळी आपले मत व्यक्त करीत असते. या व्यतिरिक्त तज्ञांच्या विविध समित्या या सूचना आणि सल्ल्यांच्या स्वरूपात प्रशासनाला प्रभावित करीत असतात. सामान्य प्रशासनातील जनतेचा सहभाग हा अप्रत्यक्ष आणि अनौपचारिक असतो. हा सहभाग सातत्यपूर्ण आणि निश्चित स्वरूपाचा नसल्याने फारसा प्रभावी ठरत नाही.

दुसऱ्या प्रकारचा सहभाग म्हणजे विकास प्रशासनातील जनतेचा सहभाग. ग्रामीण तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, बिगर शासकीय आणि स्वयंसेवी संथा इत्यादींमध्ये औपचारिकरित्या सहभागी होऊन प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग नोंदवता येऊ शकतो. या प्रकारचा सहभाग हा सामान्य प्रशासनातील सहभागापेक्षा अधिक परिणामकारक आणि प्रभावी ठरतो.

Answered by hanmantuaurade
0

Answer:

lokshahi म्हणातात त्याला

Similar questions