Political Science, asked by dilippund831, 3 months ago

राजकारणात प्रवेश करण्यासाठी आवश्यक काय आहे​

Answers

Answered by AJSINHA1
1

Answer:

राजकारणात प्रवेश करणारे लोकच पुढे जाऊन सत्ताधीश बनतात व सरकार चालवतात. यासाठी जर स्पर्धा परीक्षा ठेवली तर जे लोक आज स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासनात येतात, तेच लोक उद्या सत्तेत येतील. हे म्हणजे प्रशासनाच्याच हातात राजकीय सत्ता देणे नव्हे का?

यामुळे काही प्रश्न नक्कीच सुटतील, जसे की निव्वळ मतांच्या बराजेसाठी सवंग लोकप्रिय व लोकानुयायी निर्णय घेण्याचा कल कमी होईल. आर्थिक सुधारणे सारखे किंवा इतर बरेच निर्णय जे की जनतेच्या दबावामुळे घेता येत नाहीत, ते बिना दिक्कत घेतले जातील.

पण मग लोकशाहीचं काय? जनतेच्या खऱ्या प्रतिनिधित्वाच काय? आज जर अमेरिका, इंग्लंड सारखे देश प्रगती करू शकले ते त्या देशाच्या लोकशाहीच्या विकासामुळेच. स्पर्धा परीक्षामुळे वरती सांगितलेले जे फायदे आहेत, ते तर हुकुमशाही व्यवस्थेमधील लक्षणे सुद्धा आहेत. थोडक्यात त्याने प्रशासनाची हुकुमशाही तर तयार नाही ना होणार?

आज सर्वसाधारण परिस्थिती पाहिली तर राजकारणातील लोकांची नितीमुल्ये फार खालच्या पातळीवर गेलेली आढळतात. त्यामुळे साहजिकच बऱ्याचदा जनमताचा असा रेटा ऐकण्यास मिळतो की, राजकारणात येण्यासाठी सुद्धा स्पर्धा परीक्षा असावी. पण स्पर्धा परिक्षेमार्फत सत्तेत आलेले लोकसुद्धा प्रामाणिकपणे काम करतीलच, भ्रष्टाचार करणार नाहीत आणि कार्यक्षम राहतील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. कारण प्रशासनात असतानाही, त्यांनी बऱ्याचदा केलेले गैरवर्तन आपण पाहिलेले आहे.

याच्या उलट, राजकारणातील सर्वच लोक नितिमुल्ये हरवलेली असतात असे नव्हे. उदाहरणार्थ, आजच ज्यांचे दुःखद निधन झाले असे स्व. मनोहर पर्रीकर, जे की त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता यासाठी शेवट पर्यंत ओळखले गेले. किंवा महाराष्ट्रातील हिवरे बाजार गावाचे सरपंच श्री. पोपटराव पवार, ज्यांनी ग्राम विकासाचे क्रांतीकारी प्रारूप प्रत्यक्षात घडवून आणले. डाव्या पक्षाचे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचाही इथं उल्लेख करता येईल. या सारखी बरीच व्यक्तिमत्वे राजकारणात नक्कीच आढळतात.

Similar questions