रिकाम्या जागा भरा लाया D फिटीग विभागामध्ये जावचा प्रहमान a boda beti द्यासकाम करण्यासाठी कशाचा वापर करतात कापस फलफ्लेटफाईल वा
Answers
Answer:
मालिका सुरू असताना त्यातले प्रमुख कलाकार अचानक काही दिवसांसाठी त्यातून गायब होऊ लागलेत. अनेकांनी खासगी कारणांसाठी सुट्ट्या टाकल्या आहेत. यामुळे रिकाम्या जागांचा ट्रॅक सांभाळताना मालिकावाल्यांची तारांबळ उडतेय.
मालिका सुरू असताना एखादा कलाकार मध्येच दोन-चार दिवस न दिसणं तसं नेहमीचंच. पण आता फक्त कथानकाचा भाग म्हणून नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे ते शूटिंगला बुट्टी मारत असल्याने टीव्हीच्या पडद्यावरुन गायब झाले आहेत. ‘सास बिना ससुराल’मधली टोस्टी अशीच काही दिवसांसाठी गायब झाली होती, तर ‘बालिका वधू’मधली जग्याची आई मालिकेत सध्या अमेरिका वारी करतेय. मराठीतही ‘पुढचं पाऊल’मधली कल्याणी अशीच पन्हाळ्याला दोन दिवसांसाठी फिरायला गेल्याचं दाखवण्यात आलं होतं.
काही मालिकांना मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकारांशिवाय कधी-कधी चालवून घ्यावं लागतं. पण यामुळे गप्प बसतील तर चॅनलवाले कसले? त्यांनी काही दिवसांसाठी मालिकेचे ट्रॅकच बदलून टाकले. त्यामुळे प्रेक्षकांना कथानकातले नव-नवीन बदल पहायला मिळाले. ‘सास बिना...’मधल्या टोस्टीने तर आठ दिवसांची सिक लिव्हच टाकली होती म्हणे, त्यामुळे त्यावेळी ती मालिकेत दिसत नव्हती. ती आजारी असल्याने तिच्या विश्रांतीसाठी मालिकेने तिचा ट्रॅकच बदलला. त्यामुळे मालिकेत बरेच ट्विस्ट अॅन्ड टर्न आले. पण टोस्टी येईपर्यंत हाच ट्रॅक चालू होता.
‘पुढचं पाऊल’मधल्या कल्याणीच्या म्हणजेच जुई गडकरीच्या आजीची तब्येत बरी नसल्याने तिला सुट्टी घ्यावी लागली होती. त्यामुळे तिला सोहमबरोबर पन्हाळ्याला हवापाणी बदलण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. ‘बालिका वधू’मध्ये जग्याच्या आईने म्हणजेच स्मिता बन्सलने नुकताच मुलीला जन्म दिला असल्याने ती मालिकेत लांबच लांब काळासाठी अमेरिकेत रहाणार आहे. पण ती परत कधी येणार हे काही तिने सांगितलेलं नाही. त्यामुळे ‘बालिका वधू’ ही सासूशिवाय काही दिवस बघावी लागेल.
थोडक्यात काय तर, मालिकांमधले महत्त्वाचे कलाकारच सुट्टीवर असल्याने मालिकावाल्यांची झोप उडाली होती. एपिसोड्सच्या रंगतदारपणासाठी त्यांना अजून कसून मेहनत घ्यावी लागतेय.