Geography, asked by aniketchak8251, 1 month ago

रेखावृत्त एकमेकांना समान असतात. याचे योग्य विधान सांगा.

Answers

Answered by narhesahebrao
0

पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमधील ग्रीनविच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताचा रेखांश शून्य समजतात. त्याच्या पूर्वेकडे पूर्व रेखांश आणि पश्चिमेकडे पश्चिम रेखांश असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुव होत.

Answered by rajraaz85
0

Answer:

रेखावृत्त-

रेखावृत्त ही एक काल्पनिक अश्या रेषा असतात. रेखावृत्त या अशा काल्पनिक रेषा असतात ज्या पृथ्वीगोलावर ती असणाऱ्या विषुववृत्त या काल्पनिक रेषेला काटकोनात छेदतात.

रेखावृत्त हे वर्तुळाकार असल्यामुळे सहाजिक त्याचा अर्धा भाग पूर्व रेखावृत्त तर उरलेला भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो.

सर्व रेखावृत्त हे एकमेकांना समांतर असतात, मात्र पृथ्वीवर असणाऱ्या उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या काल्पनिक बिंदूंवर ते एकमेकांना छेदतात.

ग्रीनविच या शहराजवळ असणाऱ्या रेखावृत्ताला शून्य अंश रेखावृत्त असे समजले जाते आणि त्यामुळे त्याच्या पूर्वेला असणाऱ्या रेखावृत्तांना पुर्व रेखांश असे म्हणतात र पश्चिमेकडे असणार्‍या रेखावृत्ता ना पश्चिम रेखांश असे म्हणतात.

Similar questions