World Languages, asked by nikhilkatyar54, 5 months ago

रेलवे पवासात पवासी नागरीकांजवळ सवआळखपत्र असने अनिवाय

Answers

Answered by kumudajyotisarada
1
लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करताना ओळखपत्र सोबत नसेल तर संबंधित प्रवाशावर विनातिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यात येणार आहे. शनिवार, १ डिसेंबरपासून कोणत्याही वर्गाच्या
डब्यातून प्रवास करताना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
रेल्वे मंत्रालयाने दोन महिन्यांपूर्वी ओळखपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. अधिकृत प्रवाशांना सुविधा देण्यासाठी तसेच काळ्या बाजारात तिकिटे खरेदी करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच दलालांना रोखण्यासाठी रेल्वेने ओळखपत्र अनिवार्य केले आहे.
ओळखपत्रावर संबंधित प्रवाशाचे छायाचित्र असणे आवश्यक आहे. असे ओळखपत्र प्रवासात सोबत नसेल तर त्या प्रवाशावर विनातिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यात येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
Similar questions