Hindi, asked by khushijamma83, 2 days ago

र्मा नव्या युगाची मतदार निबंध ​

Answers

Answered by kadunimish
2

Answer:

       मी एक मतदार आहे. नुकताच मतदान करून आलो आहे. मतदानाच्या दिवशी मला कितीही महत्वाची कामे असली तरीही मी मतदान करणे कधीच चुकवीत नाही. मला मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून माझा मतदानाचा नेम अजून एकदाही चुकला नाही. विधान सभेची निवडणूक असो व लोकसभेची निवडणूक किंवा गावातली ग्रामपंचायतीची निवडणूक असो, मी आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य मतदानाला जातो. पण खरे सांगायचे तर आत्ता मी निराश झालो आहे.

       आम्ही मतदार न चुकता मतदान करतो आणि योग्य त्या उमेदवाराला निवडून आणतो. परंतु निवडणुकीच्या आधी उमेदवारांनी जनतेला दिलेली आश्वासने, खाल्लेल्या आणा-भाका जनतेने निवडून दिलेले आमदार, खासदार विसरून जातात. आणि जनतेकडे लक्ष देत नाहीत, जनतेची कामे करीत नाहीत आणि जर का काही कामे हाती घेतली तर त्यात भ्रष्टाचार केल्याशिवाय राहत नाहीत. जनतेचाच पैसा जनतेच्या विकासासाठी ण वापरता ते आपलेच खिसे भरून घेतात आणि मौजमजा करतात. आज आपण पहिले तर असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही की ज्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार झाला  नाही मग ते छोट्या गावपातळीवरील काम असो व देश पातळीवरील काम असो. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार  करतात. आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणवर भ्रष्टाचार सुरु आहे. याला थांबवणार कोण? आज भ्रष्टाचार थांबवू शकणारे लोकप्रतिनिधीच भ्रष्टाचार करू लागलेत. जर हे का असेच सुरु राहिले तर देशाची प्रगती कधीच होणार नाही. आणि आपले विकसित भारत बघण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.

       आपण ज्यांना आपले लोकप्रतिनिधी समजतो त्यांची गुंडांमध्ये उठबस असते. एखाद्या व्यक्तीवर दबाव आणण्यासाठी तसेच आपले काम करून घेण्यासाठी वा अन्य गोष्टींसाठी ते गुंडांचा वापर करून घेतात. मतदान करताना, लोकप्रतिनिधी निवडून देताना निट विचार न केल्यास योग्यता नसलेले उमेदवार निवडून येतात आणि साऱ्या राज्यकारभाराचे बारा वाजवतात आणि या सर्वांचे होणारे परिणाम कोणाला भोगायला लागतात तर... सामान्य नागरिकांना म्हणजेच मतदारांना.

       मित्रांनो तुमची बारावी होईपर्यंत तुमचे मतदान करण्यासाठीचा अधिकार मिळवण्यासाठीचे लागणारे किमान १८ वर्षे वय पूर्ण होईल आणि तुम्ही मतदानासाठी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला देखील मतदानाचा अधिकार मिळेल. तुम्हीही तुमच्या आवडीचा, तुम्हाला योग्य वाटणारा या देशाचे हित करू शकणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्यास सक्षम व्हाल. १८ वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार भारताच्या राज्यघटनेने दिला आहे. मतदानाचा हा अधिकार फार मोठा अधिकार असतो; त्यामुळे तो प्रत्येकाने व्यवस्थितपणे  बजावणे गरजेचे आहे. जर आपण मतदान केले नाही तर निवडून आलेल्या प्रतिनिधीला त्याच्या हुकीच्या कामाबाबत जाब विचारणे शक्य होत नाही. म्हणून आपल्याला मिळालेला हा अधिकार आपण वापरणे फार गरजेचे आहे.

       जेव्हा निवडणुका जाहीत होतात. तेव्हा विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी मतदारांच्या घरी जातात आणि सामान्य जनतेला खोटी आमिषे दाखून, वेळ आली तर पैशाने मते विकत घेऊन आपल्या विजय निश्चित करतात. मी एक मतदार आहे. या आधी खूप निवडणुका अनुभवल्या आहेत. हे  उमेदवार निवडणुकीच्या आधी जनतेला आश्वासने देतात आणि जनतेने त्यांना निवडून दिल्यांनतर जनतेच्या प्रश्नांकडे ते ढुंकून सुद्धा पाहत नाहीत. त्यांना जनहिताची कळकळ नसते, ते देशहिताचा विचार कधीच करत नाहीत ते फक्त आपले खिसे कसे भरून घेता येतील याचा विचार करतात आणि त्याप्रमाणे वागतात. जनहिताची कळकळ असणारा  उमेदवाराला निवडून देताना तो उमेदवार चारित्र्यवान, जनहिताची कळकळ असणारा व देशाच्या हिताचा विचार करणारा असावा. जेणेकरून तो सामान्य जनतेचे हित साधू शकेल.

       आपला लोकप्रतिनिधी निवडून देताना तो गुंड, भ्रष्टाचारी, तसेच धर्माच्या नावाने लोकांच्या भावना भडकावणारा नसावा. जर तसा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला असेल तर य्ताला त्याची योग्य ती  जागा दाखून देणे गरजेचे आहे. तो जनतेचे हित कधीच करू शकणार नाही, ना तुमचे प्रश्न सोडवू शकणार . फ़्क़्त समाजामध्ये भांडणे लावून लोकांच्या भावना भडकावणे आणि त्यात आपली पोळी भाजून घेणे इतकेच तो करू शकेल.

       तुमच्या आजच्या या युवापिढीवरच देशाचे पुढचे भविष्य अवलंबून आहे. आपला योग्य प्रतिनिधी असला तरच आपले भवितव्य चांगले असू शकेल अन्यथा नाही त्यामुळे देशाचे भवितव्य हे आपल्याच हातात आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेऊन त्याप्रमाणे योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत.

Similar questions