Science, asked by mukeshwaghari89, 28 days ago

रासायनिक किटकनाशके का वापरु नयेत याबाबत माहीती

Answers

Answered by pratiksutar701
14

Explanation:

कापूस आणि सोयाबीनवर कीटकनाशक फवारताना आतापर्यंत ३२ शेतक-यांचा मृत्यू झाला. २५ शेतक-यांना अंधत्व आले, तर सातशेच्या वर बाधित झाले आहेत. या घटनेने कृषी आयुक्त जागे झाले. सरकार आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे. जहाल कीटकनाशक उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्याचे आणि बंदी घालण्याचे आदेश दिले गेले. जुलै २०१७ पासून शेतकरी कीटकनाशक फवाऱयाने विष बाधित होऊन रुग्णालयात दाखल होत होते. त्यावेळीच दखल घेतली असती, तर असा हाहाकार उडाला नसता. प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत बातम्यांनंतर सरकारने दखल घेण्यात आली. हा प्रकार ‘वरातीमागून घोडे’ असा आहे. सरकारने मृत्यू झालेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत जाहीर केली. तसेच फवारणीसाठी मास्कचे वाटप करणार. सरकारने संवेदनशीलता दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु एकविसाव्या शतकात फवारणी करणाऱया शेतकऱयांचे बळी जावेत. हीच मुळात प्रगत महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. फवारणी करणाऱयांच्या नाकातोंडाव्दारे विषारी द्रव्ये शरीरात मिसळतात. शिवार विषारी झाल्याने किडी, अळ्यांचा जीव घेणारी रसायने माणसालाही मारत आहेत. अनेक वर्षांपासून काही विदेशी कंपन्या आपल्या देशात कीटकनाशकाच्या नावावर अत्यंत विषारी कीटकनाशके तयार करतात. नंतर त्याची जाहिरात करून ते औषध शेतकऱयांना घेण्यास बाधित करतात. असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. तरीही या फवारण्या जीवघेण्या का ठरल्या? फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची याची माहिती शेतकऱयांना होती का? त्यामुळे याचा दोष रसायनांना द्यावा की, शेतकऱयांना द्यावा? असे अनेक प्रश्न उभे राहतात. देशभरात कोणत्या पिकावर कोणते कीटकनाशक फवारावे, त्याची मात्रा किती असावी, फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी या सर्वांची माहिती देणाऱया राज्यात चार प्रयोगशाळा आणि चार कृषी विद्यापीठे आहेत, परंतु या संस्थांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. देशातील यंत्रणा इतकी सक्षम आहे की, शेतात प्रत्येक बी-बियाणे खत कीटकनाशकांची अत्यंत कठोरपणे करून दिली जात असेल, तर मग अशा घटना का घडतात? आजचा शेतकरी आधुनिक शेतीचा गुलाम आहे. शेतकऱयाला नवी पिके, संकरित बियाणे, रासायनिक खते, विषारी कीटकनाशकांचा वापर करतात, पण ही औषधे कीटकांना नव्हे तर माणसाला मारक ठरत आहेत. तेव्हा आता सरकारने यासंदर्भात गांभीर्याने विचार करून शेतकऱयांनी कोणती कीटकनाशके वापरावीत याचे कडक नियम करावेत. कीटकनाशकांच्या फवारणीत कोणती दक्षता घ्यावी यासाठी शेतकऱयांमध्ये मोठय़ा प्रमाणात जागरुकता करणे महत्त्वाचे आहे. तसेच शेतकऱयांनी शेतीसाठी कोणती औषधे वापरावीत याची दक्षता घ्यावी

Answered by tanishaag2710
0

Answer:

कीटकनाशकांच्या प्रदर्शनामुळे त्वचेच्या आणि डोळ्यांच्या सामान्य जळजळीपासून ते मज्जासंस्थेवर परिणाम होणे, श्रवण, प्रजनन समस्या निर्माण करणारे हार्मोन्सची नक्कल करणे आणि कर्करोग देखील होऊ शकतो यासारखे विविध प्रकारचे प्रतिकूल आरोग्य परिणाम होऊ शकतात.

Explanation:

कीटकनाशके ही रसायने आहेत जी कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी वापरली जातात. सर्व कीटकनाशके कीटक जीवांच्या नैसर्गिक जैवरासायनिक कार्यांशी संवाद साधतात आणि त्यांचे नियमन करण्यासाठी असलेल्या जीवांच्या प्रकारानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते.

कीटकनाशके ही अशी विषे आहेत जी त्यांना ज्या कीटकांचा नाश करायचा आहे त्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतात. ते धोकादायक आहेत आणि ते मानवांमधील गंभीर आजार आणि रोगांच्या विस्तृत श्रेणीशी जोडलेले आहेत, ज्यात श्वसनाच्या समस्यांपासून कर्करोगापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. कीटकनाशके विविध प्रकारे वापरली जाऊ शकतात. बियाणे, झाडे आणि धान्य साठवणुकीच्या हाताळणीचा परिणाम म्हणून कृषी कामगार उघड होऊ शकतात. आपल्या आहारात कीटकनाशकांच्या अवशेषांची उपस्थिती आपल्याला दररोज धोक्यात आणते.

शेती आणि शहरी भागात वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांमध्ये आपली हवा प्रदूषित करण्याची क्षमता असते, ज्यामुळे मानव, प्राणी आणि वनस्पतींना हानी पोहोचते. वातावरणात सोडले जाणारे कीटकनाशके पृथ्वीवर स्थिर होऊ शकतात, सूर्यप्रकाश आणि वातावरणातील पाण्यामुळे विघटित होऊ शकतात किंवा वातावरणात विसर्जित होऊ शकतात. दीर्घकालीन कीटकनाशकांच्या वापरामुळे स्मरणशक्ती कमी होणे, चिंता, मूड बदलणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. शरीराचे आजारांपासून संरक्षण करणारी रोगप्रतिकारक शक्ती काही विशिष्ट कीटकनाशकांमुळे कमकुवत होते.

For more similar reference:

https://brainly.in/question/36819688

https://brainly.in/question/53362583

#SPJ3

Similar questions